नाशिक: धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात कंत्राटी नोकरीचे आमिष दाखवून नाशिकसह धुळ्यातील ९० जणांची सुमारे दीड कोटीची फसवणूक करून पसार झालेल्या संशयित कविता भदाणे हिला सरकारवाडा पोलिसांनी शहरात सापळा रचून शिताफीने अटक केली. न्यायालयाने तिला १८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकरणी मेमध्ये सरकारवाडा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यातील मुख्य संशयित वैभव पोळ यास यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.