Nashik Makar Sankranti: गई बोले रे धीना...पतंगप्रेमींचा जल्लोष अन तिळगुळाचा गोडवा! शहरात मकरसंक्रांत उत्साहात

गई बोले रे धिना...बरोबरच डीचे दणदणाट व तरुणाईच्या जल्लोषात शहरासह उपनगरांत दिवसभर पतंगोत्सवाची धूम चांगलीच रंगली...
Youths cheering at the sight of high kites flying in the sky on the occasion of Makar Sankranti.
Youths cheering at the sight of high kites flying in the sky on the occasion of Makar Sankranti.esakal

नाशिक : गई बोले रे धिना...बरोबरच डीचे दणदणाट व तरुणाईच्या जल्लोषात शहरासह उपनगरांत दिवसभर पतंगोत्सवाची धूम चांगलीच रंगली.

कुठे सुर तर कुठे डिजे चा दणदणाट अशा मोठ्या जल्लोषात सोमवारी पतंग प्रेमींनी मकरसंक्रांत उत्साहात साजरी केली. दिवसभर आकाशात उंचच उंच उड्डाण करणारे बहुरंगी पतंग अन् सोबतीला ढिल दे...चा अखंड नारा सुरू होता.

यात तरुणाबरोबरच ज्येष्ठांनीही अनेक ठिकाणी पतंगोत्सवाचा आनंद लुटला. विशेष म्हणजे यात अनेक ठिकाणी तरुणीही आघाडीवर होत्या. सायंकाळच्या तीळगुळाच्या गोडव्याने या आनंदात भरच पडली. (joy of kite lovers sweetness of Tilgul Makar Sankranti in city nashik news)

मकरसंक्रांतीनिमित्त आकाशात उडणाऱ्या उंचच उंच पतंग पाहून जल्लोष करत असलेले युवक
मकरसंक्रांतीनिमित्त आकाशात उडणाऱ्या उंचच उंच पतंग पाहून जल्लोष करत असलेले युवकesakal

मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलिसांनी नॉयलॉन मांजाच्या वापराविरोधात ठोस भूमिका घेतल्याने नॉयलॉन दो-यापासून होणारे संभाव्य अपघात आटोक्यात राहिले.

मांजा, पतंगाच्या दरांत वाढ

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मांजाच्या दरांत २० टक्के भाववाढ झाली, मात्र या भाववाढीच्या पतंगप्रेमींच्या जल्लोषावर कोणताही परिणा झालानाही, हे या व्यवसायातील दिवसभराच्या लाखो रुपयांच्या विक्रीतून स्पष्ट झाले.

नायलॉन मांजाची विक्री पूर्णपणे बंद केली असल्याने त्याची विक्रेत्यांसह पतंगप्रेमींकडूनही खबरदारी घेतली जात होती. शहरासह सिडको, सातपूर, म्हसरूळ, मखमलाबाद, इंदिरानगर, पाथर्डी फाटा आदी भागातही पतंगोत्सवाची धूम रंगली. हा उत्साह अंधार पडलातरी टिकून होता.

Youths cheering at the sight of high kites flying in the sky on the occasion of Makar Sankranti.
Nashik: महाराष्ट्रातील 35 हजार विहिरींच्या पाण्याने अयोध्येत प्रभू श्रीरामाचा होणार जलाभिषेक!

तिळगुळाचा गोडवा

पतंग उत्सवाचा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी शहरात सर्वत्र तिळगुळ वाटपाचा उत्साह होता. यात तरुणाईसोबतच चिमुरड्यांमध्ये मोठा उत्साह होता.

सकाळच्या सुमारास शहरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी तिळगुळ वाटप करत नवीन वर्षाचा पहिला सण मोठ्या उत्साहात साजरा केला. अनेक ठिकाणी घरगुती तसेच सामुहिक तिळगूळ वाटपाचे नियोजन करण्यात आले होते.

यंदा पारंपारिक तीळांबरोबरच तिळाचे लाडू, रेवड्या, वडी यांना चांगली मागणी होती. यंदा तिळाच्या दरांतही वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

‘जय श्रीराम’ची क्रेझ

अयोध्येतील श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्यापार्श्‍वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून घरोघर जयश्रीरामचा जयघोष सुरू आहे. याचा प्रतिबिंब यंदाच्या पतंगोत्सवावर पडल्याचे दिसून आले.

श्रीरामासह पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा असलेल्या पतंगाना मोठी मागणी होती.सहा इंचापासून चार फूट आकाराचे पतंग बाजारात उपलब्ध होते. पक्षांच्या आकाराच्या पतंगाबरोबरच कार्टून असलेल्या पतंगानाही चिमुरड्यांकडून मागणी होती.

Youths cheering at the sight of high kites flying in the sky on the occasion of Makar Sankranti.
Nashik News : भारती, तुला काय व्हायचे आहे? PM मोदी यांचा कावनईच्या भारती रणला सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com