Nashik Crime News : ‘त्या’ चार संशयितांना न्यायालयीन कोठडी

Manmad: Lohmarg Police carrying four suspects in child trafficking case.
Manmad: Lohmarg Police carrying four suspects in child trafficking case.esakal

Nashik News : बिहारमधून महाराष्ट्रात मुलांच्या तस्करीप्रकरणी अटकेतील चार संशयितांची १२ दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने आज (ता.१२) मनमाड न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बिहार राज्यातून महाराष्ट्रातील सांगली येथील मदरशामध्ये शिक्षणाच्या नावाखाली दानापूर -पुणे एक्सप्रेसमधून घेऊन जातांना संशयित तस्करांचा डाव रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी हाणून पाडला होता. (Judicial custody of four suspects Nashik Crime News)

मनमाड रेल्वे स्थानकावर ३० लहान बालके आणि चार संशयित तस्करांना ताब्यात घेण्यात आले होते. सदर मुलांना नाशिक येथील बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.

तर मनमाड येथे पकडलेले सद्दाम हुसेन सिद्दिकी (वय २३), नौमान सिद्दिकी (वय २८), एजाज सिद्दिकी (वय ४०), मोहम्मद शहा नवाज (वय २२, सर्व बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातील रहिवासी) या चार संशयितांना चांदवड येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

मात्र आज यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना मनमाड न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या १२ दिवसात लोहमार्ग पोलिसांची पथके बिहार आणि सांगलीमध्ये जाऊन आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Manmad: Lohmarg Police carrying four suspects in child trafficking case.
Nashik News : घरबसल्या करता येणार शासनाच्या दाखला मागणीचा प्रस्ताव सादर ! या संकेतस्थळावर करा अर्ज

ताब्यात आलेल्या संशयितांची कसून चौकशी करण्यात आली आहे. मुले ज्या बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातील राहणारे असल्याने तिथे जाऊन त्यांच्या आईवडिलांचा शोध घेण्यात आला असला तरी मुलांच्या पालकांनी मनमाड लोहमार्ग पोलिस ठाण्यात येऊन आपले जबाब नोंदवले आहे.

या चौघा संशयितांना न्यायालयाने नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले. लवकरच या चौघांच्या जामिनावर न्यायालयात अपील करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांची चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप संशयित आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे.

Manmad: Lohmarg Police carrying four suspects in child trafficking case.
Crime News: रिक्षात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरडाओरडा करताच रिक्षातून बाहेर फेकलं अन्...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com