Z P News : सीईओंच्या परिक्षेत कनिष्ठ, सहाय्यक अधिकारी फेल!

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
ZP CEO Ashima Mittal, Nashik Newsesakal

Nashik News : तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह तालुकानिहाय पंचायत समित्यांमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांची मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी लेखी परिक्षा घेतली होती. (Junior Assistant Officer fails CEOs exam in zilla parishad nashik news)

या लेखी परिक्षेचा पेपर तपासणी झाली असून यात, ४० टक्के अधिकारी फेल झाल्याचे समजते. निर्धारित मार्कपेक्षा कमी मिळालेल्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे फर्मान काढण्यात आल्याची चर्चा आहे.

गत दोन महिन्यात मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांनी कळवण, दिंडोरी, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर यासह मालेगाव तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये बैठक घेत आढावा घेतला. यात प्रामुख्याने पंचायत समित्यांमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांचे कामकाज असमाधानकारक आढळून आले होते.

त्यावर, मित्तल यांनी तातडीने मंगळवारी (ता.९) मुख्यालयातील तसेच प्रत्येक पंचायत समितीमधील कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांची बैठक घेतली होती. प्रशासकीय कामकाजाची अधिकारी यांना किती माहिती आहे, हे जाणून घेण्यासाठी मित्तल यांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांची परिक्षा घेतली होती. यात १५ सहाय्यक प्रशासन अधिकारी तर, ३६ प्रशासन अधिकारी यांनी ६० मार्कची परिक्षा दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
NMC News : निश्चित संरेषेबाहेर रस्ते खोदणे पडले महाग! महापालिकेकडून स्मार्टसिटी कंपनीची कामे रद्द

त्यानंतर अधिकाऱ्यांच्या पेपरची तपासणी झाली आहे. यात तब्बल ४० टक्के अधिकाऱ्यांना कमी मार्क म्हणजे अगदी १० ते १५ दरम्यान मार्क प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे. कमी मार्क प्राप्त झालेल्या या अधिकाऱ्यांना फेल ठरविण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांना नोटीस बजाविली जाऊन त्यांची पुन्हा परिक्षा घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे नाव लिहिता आले नाही

कनिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यत प्रशासन अधिकारी हे विभागांचे प्रमुख असतात. या अधिकाऱ्यांमार्फत विभागातील प्रत्येक फाइल लिहिली जाते. मात्र, हेच अधिकारी फेल ठरत असतील तर ते कसे कामकाज करत असतील, याची चर्चा न केलेली बरी. पेपर तपासणीत प्रशासन प्रमुख असलेल्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे नाव अनेक अधिकाऱ्यांना लिहिता आले नसल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
NMC News : महापालिका हद्दीतील 4 शाळा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी 48 तासांची मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com