Kalaram Mandir Kirtan Mahotsav : श्री काळाराम संस्थानात मंत्रघोषात कीर्तन; 3 दिवस भरगच्च कार्यक्रम

Dignitaries worshiping the image of Narada Maharshi during the Kirtan festival at Sri Kalaram Temple.
Dignitaries worshiping the image of Narada Maharshi during the Kirtan festival at Sri Kalaram Temple. esakal

Nashik News : प. पू. देवर्षी नारद महाराज यांच्या जयंतीनिमित्त व श्री काळाराम कीर्तन मंडळ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ६ ते ८ मे या तीन दिवसाच्या कार्यक्रमास शनिवारी (ता. ६) काळाराम मंदिराच्या प्रांगणामध्ये आरंभ झाला.

महोत्सवानिमित्त मंदिराच्या आवारात तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Kalaram Mandir Kirtan Mahotsav occasion of festival lot of programs were organized in temple from 6 to 8 may nashik news)

कार्यक्रमाच्या सुरवातीला वेदमंत्रघोष वे. शा. सं. भालचंद्र शास्त्री, वे. शा. सं. कौस्तुभ शौचे, वेद उपासक अद्वैत पुजारी यांच्या मंत्रघोषाने प्रारंभ झाला. याप्रसंगी कीर्तन मंडळाचे अध्यक्ष शिवदास डागा, प. पू. जगद्गुरू श्री शंकराचार्य स्वामी सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती, मनोहर पुजारी, कार्यवाह संजय पुजारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले व परमपूज्य देवर्षी नारद महर्षींच्या प्रतिमेचे पूजन झाले.

या वेळी अचला वाघ आणि सहकारी यांनी नारद गीत पठण केले. यानंतर गतकाळात निधन झालेले कीर्तनकार, प्रवचनकार व अन्य मान्यवर तसेच ज्ञात अज्ञात व्यक्ती यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी राज्यभरातून आलेल्या कीर्तनकारांचे व उपस्थितांचे स्वागत श्री काळाराम कीर्तन मंडळाचे अध्यक्ष शिवदास डागा यांनी केले.

नारद जयंती महोत्सवाचे संबंधाने आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हभप अनंत बुवा कर्वे यांनी केले. याप्रसंगी परमपूज्य शंकराचार्य स्वामी सच्चिदानंद भारती यांचे विशेष पूजन झाले. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुणे श्रीपाद महाराज ढोले रत्नागिरी, हभप अनंत बुवा कर्वे पनवेल, चतु:शाखीय ब्रह्मवृद्ध संस्थेचे पदाधिकारी डॉ. एकनाथ कुलकर्णी तसेच श्री काळाराम मंदिर विश्वस्त मंगेश बुवा पुजारी यांचे शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Dignitaries worshiping the image of Narada Maharshi during the Kirtan festival at Sri Kalaram Temple.
Sinnar Unseasonal Rain : सिन्नरमध्ये अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा

यानंतर गुरुवाणी ग्रंथाचे प्रकाशन झाले, याप्रसंगी आचार्य ढोले बुवा यांनी मनोगत व्यक्त केले. परमपूज्य संकेश्वरपीठ (करवीर पीठ) शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती यांनी सर्वांना आशीर्वाद प्रदान केले. सूत्रसंचालन हभप माधवदास राठी महाराज व हभप प्रभंजन भगत यांनी केले.

या वेळी शहरातून आलेल्या मान्यवरांसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेली कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी उपस्थित होती. महोत्सवात रविवारी (ता. ७) आळंदी येथील यशोधन महाराज साखरे यांचे सकाळी साडेआठला प्रवचन, तर १० वाजता गणुदासी परंपरेतील कीर्तन सादर होईल. रात्री साडेआठला राष्टीय कीर्तनकार कैलासबुवा खरे हरिदासी कीर्तन सादर करतील.

Dignitaries worshiping the image of Narada Maharshi during the Kirtan festival at Sri Kalaram Temple.
NIMA Power Exhibition : इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री भुसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com