Kalavan APMC : कळवण बाजार समिती सभापतीपदी धनंजय पवार! दत्तू गायकवाड उपसभापती

Dhananjay Pawar as Chairman of Agriculture Produce Market Committee and Dattu Gaikwad as Deputy Chairman unopposed MLA Nitin Pawar.
Dhananjay Pawar as Chairman of Agriculture Produce Market Committee and Dattu Gaikwad as Deputy Chairman unopposed MLA Nitin Pawar.esakal

Kalavan APMC : लोकनेते ए.टी.पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय पवार यांची तिसऱ्यांदा तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिवासी नेते दत्तू गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. (Kalavan APMC Dhananjay Pawar as Chairman of Kalavan Market Committee Dattu Gaikwad Vice Chairman nashik news)

गुरुवारी (ता.२५) आज आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी चिंतामण भोये यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा होऊन त्यात सभापती व उपसभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

सभापतीपदासाठी माजी सभापती धनंजय पवार व उपसभापती दत्तू गायकवाड या दोघांचे निर्धारित वेळेत एकमेव नामनिर्देशन दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणूक निमित्ताने आयोजित सभेला परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित संचालक ज्ञानदेव पवार भरत पाटील व शितलकुमार अहिरे हे मात्र अनुपस्थित राहिले.

सभापतीपदावर धनंजय पवार यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली असून उपसभापतीपदावर आमदार नितीन पवार यांनी पश्चिम पट्ट्यातील दत्तू गायकवाड या आदिवासी नेत्याला संधी देऊन पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागाला सभापती व उपसभापतीपदाचा मान दिला.

आमदार नितीन पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती धनंजय पवार व उपसभापती दत्तू गायकवाड यांचा व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.

आमदार पवार म्हणाले, की कोणतीही निवडणूक ही दोन दिवसाची असते. त्यामुळे सर्व संचालक मंडळाने एकत्र येऊन संवाद साधने गरजेचे आहे. कळवण तालुक्यात चुकीच्या पद्धतीचे अनुकरण होऊ नये अशी अपेक्षा करतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhananjay Pawar as Chairman of Agriculture Produce Market Committee and Dattu Gaikwad as Deputy Chairman unopposed MLA Nitin Pawar.
Dindori APMC : दिंडोरीत सभापतीपदी कड, कैलास मावळ उपसभापती

बाजार समितीच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून शेतकरी व्यापारी हमाल मापारी व प्रशासन यांच्यात समन्वय ठेवत जास्तीत जास्त सुविधा कशा निर्माण करता येतील या दृष्टीने नवीन पदाधिकाऱ्यांनी कामकाज करावे.

बाजार समितीला लोकनेते ए टी पवार यांचे नाव देण्यात आले असल्यामुळे या नावाला गालबोट लागेल असे काम सत्ताधारी व विरोधक यांनी करू नये असे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, महेंद्र हिरे, दादाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी नगराध्यक्ष कौतिक पगार, यशवंत गवळी, ॲड.संजय पवार, भूषण पगार, प्रभाकर पाटील, सोमनाथ पवार, मधूकर जाधव, बाळासाहेब गांगुर्डे, सुधाकर खैरनार, शशिकांत पवार, शिवाजी जाधव, प्रवीण देशमुख, चंद्रकांत पवार, भगवान पाटील, युवराज गांगुर्डे, दिलीप कुवर, पंढरीनाथ बागूल, प्रवीण देशमुख, सुनीता जाधव, रेखा गायकवाड, बाळासाहेब वराडे, विलास रौंदळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार राकेश हिरे यांनी मानले.

"बाजार समितीत गेल्या चौदा वर्षात अनेक विकास कामे झाली आहेत. आगामी काळात आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, व्यापारी, संचालक मंडळ यांना विश्वासात घेऊन मार्गी लावून मतदार व शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवू."

- सभापती धनंजय पवार

Dhananjay Pawar as Chairman of Agriculture Produce Market Committee and Dattu Gaikwad as Deputy Chairman unopposed MLA Nitin Pawar.
Ghoti APMC : घोटी बाजार समितीच्या सभापतीपदी ज्ञानेश्‍वर लहाने! बिनविरोध निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com