Nashik : कपिला नदीला मिळाली ओळख

environment workers
environment workersesakal

पंचवटी (जि. नाशिक) : पौराणिक, ऐतिहासिकदृष्ट्या (Historical Background) महत्त्वाची असलेल्या व कपिल मुनींनी काही काळ वास्तव्य केलेल्या तपोवनातील कपिला नदीला (Kapila River) अनेक वर्षांनी ओळखरूपी न्याय मिळाला. या वेळी निशिकांत पगारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पर्यावरणप्रेमींकडून परिसरात वृक्षारोपणही (Plantation) करण्यात आले. (Kapila River got justice after many years Nashik News)

environment workers
HSC Result : एकाच कुटुंबातील सासरे, सून, दीर बारावीत उत्तीर्ण

अनेक वर्षांपासून कपिला नदीवर तिची ओळख असलेल्या नावाचा फलक लावण्यात यावा, अशी कपिला नदी संवर्धन समितीच्या वतीने मागणी करण्यात येत होती. नदीला तिच्या हक्काची जागा द्या, ही मागणी करत कपिला नदीच्या नावाचे नामफलक लावण्याची मागणीही वारंवार करण्यात आली. शनिवारी (ता. ११) पर्यावरणप्रेमी निशिकांत पगारे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत कपिला नदीकिनारी १० वृक्ष व कपिला नदी बोर्ड लावून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यासाठी मनपा पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडीया व विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी कपिला नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष योगेश बर्वे, सचिव दीपक बैरागी, सुनील परदेशी, रोहित कानडे व प्रकाश बेळे आदी उपस्थित होते.

environment workers
नाशिक : मटक्यासाठी लाच घेणारे 2 पोलिस कर्मचारी ताब्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com