Nashik Krishithon 2023: कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्या ‘कृषिथॉन’चे उद्‌घाटन; 5 दिवस शेतकऱ्यांचा कुंभ

Sahil Nyaharkar giving information about 'Krishithon'. Neighbors Sanjay Nyaharkar, Arun Mulane, Nitin Marathe, Laxmikant Jagtap.
Sahil Nyaharkar giving information about 'Krishithon'. Neighbors Sanjay Nyaharkar, Arun Mulane, Nitin Marathe, Laxmikant Jagtap.
Updated on

Nashik Krishithon : शेती तंत्रज्ञानात काळानुरूप होणारा बदल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिथॉन प्रदर्शनाचे २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान ठक्कर डोम येथे आयोजन करण्यात आले आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २३) सकाळी दहाला कृषिथॉनचे उद्‌घाटन होईल.

कृषिथॉन प्रदर्शनाचे यंदाचे १६ वे वर्ष असून, पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात ३०० पेक्षा अधिक स्टॉल्स असणार आहेत. (Krishithon exhibition organized from 23rd at Thakkar Dome nashik news)

जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याने कमी पाण्यावर आधारित तंत्रज्ञान, कांदा व टोमॅटो प्रक्रिया उद्योग, सोलर तंत्रज्ञान, शेततळे, मत्स्यशेती आणि विशेष म्हणजे ड्रोनचा शेतीसाठी प्रभावी वापर कसा होऊ शकतो, हे यंदाच्या कृषिथॉनचे वैशिष्ट्य असणार आहे.

याविषयी कृषिथॉनचे आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर, नाशिक अॅग्रीकल्चर डीलर्स असोसिएशनचे (नाडा) उपाध्यक्ष अरुण मुळाणे, संचालक नितीन मराठे, लक्ष्मीकांत जगताप उपस्थित होते. साहिल न्याहारकर म्हणाले, की कृषिथॉनमध्ये ‘प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार’ (पुरुष गट) व (महिला गट), ‘प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार’, ‘प्रयोगशील युवा संशोधक पुरस्कार’, ‘प्रयोगशील कृषीविस्तार कार्य’, ‘गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार’ या पुरस्कारांचा समावेश आहे.

Sahil Nyaharkar giving information about 'Krishithon'. Neighbors Sanjay Nyaharkar, Arun Mulane, Nitin Marathe, Laxmikant Jagtap.
Nashik Agriculture News: जिल्ह्यात रब्बीची केवळ 8 टक्के पेरणी; 1 लाख 14 हजार 249 हेक्टर क्षेत्र निश्चित

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी ‘प्रश्न शेतकऱ्यांचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यात कृषिथॉन आदर्श द्राक्ष, डाळिंब, पेरू, कांदा, टोमॅटो उत्पादक शेतकरी सन्मान, कृषिथॉन आदर्श शेतकरी उत्पादक कंपनी सन्मानही या कार्यक्रमात वितरित केले जाणार आहेत. चर्चासत्रात दर्जेदार कृषी उत्पादन आणि मूल्यवर्धनातील संधी व कृषी पर्यटनावर मार्गदर्शन करण्यासाठी अभिनेते मिलिंद गुणाजी उपस्थित राहणार असल्याचे आयोजक न्याहारकार यांनी सांगितले.

कृषिथॉनचे आकर्षण

२४ नोव्हेंबर : कृषिथॉन युवा सन्मान, दर्जेदार द्राक्ष उत्पादन आणि मूल्यवर्धन

२५ नोव्हेंबर : दर्जेदार डाळिंब व पेरू उत्पादन आणि मूल्यवर्धनातील संधी

२६ नोव्हेंबर : कृषी क्षेत्रातील महिलांचा सन्मान, कांदा- टोमॅटो आणि स्टार्टअप, मिलेट प्रक्रिया, कृषी उत्पादन मूल्यवर्धनात स्टार्टअप आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना संधी

२७ नोव्हेंबर : कृषिथॉन कृषी पर्यटन चर्चासत्र

Sahil Nyaharkar giving information about 'Krishithon'. Neighbors Sanjay Nyaharkar, Arun Mulane, Nitin Marathe, Laxmikant Jagtap.
Nashik Krishithon 2023: नाशिकमध्ये 23 नोव्हेंबरपासून ‘कृषिथॉन’; कर्तबगारांचा पुरस्काराने होणार सन्मान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com