
Nashik News : पेठ- सुरगाणा सीमावर्ती भागातील गावांत मूलभूत सुविधांचा अभाव!
मनखेड (जि. नाशिक) : स्वातंत्र्याच्या अमृततमहोत्सवानिमित्त ठिकठिकाणी वेगवेगळ्या दिनानिमित्त कार्यक्रम होत असताना जिथे अभिमास्पद वाटून ताठ मान होते आणि दुसरीकडे काळ्याकुट्ट अंधारात वषार्नुवर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी भागातील छोट्या-छोट्या पाड्यांवरील बांधवांना बघून मान खाली जाते, असे काही खेडेगावातील वास्तविक चित्र बघायला मिळते. (Lack of basic facilities in villages of Peth Surgana border area after 75th year of independence nashik news)
नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागातील गावांना आजही मरणयातना भोगाव्या लागत आहेत. पेठ तालुक्यातील दमणगंगा नदीच्या कडेला वसलेली गावे आणि सुरगाणा पार नदीला वसलेली गावे यात अद्याप बद्दल झालेला नाही. येथील माणसांच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख मूलभूत गरजा सोडल्या तर इतर गरजा भागवण्यासाठी धडपड सुरूच आहे.
त्यात आरोग्य, शिक्षण, रोजगार ज्यांना चांगल्याप्रकारे मिळाल्या त्यांचे आयुष्यमानाबरोबरच जीवनही सुधारले; पण मुळात पहिल्या तीन गरजाच पूर्ण झालेल्या नाहीत. कित्येक वर्षापासून रस्तेच नाहीत, त्या गावात डॉक्टर, शिक्षक, वा इतर गोष्टी जातीलच कशा, शिवाय वीज आहेत ते लोकसंख्या घराची वाढती संख्या बघता विजेचे खांबही मुबलक आहेत, त्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी कुणीही प्रयत्न केलेला दिसत नाही.
गावांना वीज पोहचली उशिरा; परंतु ती वेळेवर येते का हे गणित सुटेना. काही गावे काळ्याकुट्ट अंधारात जीवन जगत आहे. रात्रीच्या वेळी जंगली पशु, प्राण्यांपासून संरक्षण होईल, यासाठी वीज वेळेवर देणे आवश्यक आहे.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
ट्रान्सफर बदलायचा असेल तर तो वेळेवर मिळत नाही, अशा अनेक समस्याचा विळखा विचारानेच संवेदनशील असणारी तुम्ही आम्ही नक्कीच सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. जिथे वीजच नाही तिथे पाणी गावापर्यंत कसे पोहचेल.
पाणी प्यायलाच मिळत नसेल तर शेतीला कुठून मिळणार हाही प्रश्न आहेच यावर काही उपायोजना झालेल्या नाहीत. पेठ, सुरगाणा तालुक्यातील नदीकडेचा परिसर उन्हाळयात कोरडाच पडतोय. पावसाळ्यात तुडुंब नदी नाले वाहतात.
अनेक गावांना शेतजमीन उपलब्ध आहे; परंतु ती ओलिताखाली आणवयाची झाल्यास पाण्याच्या सोयीबरोबरच शेतजमिनीला पाणी कसे मिळेल यासाठी शेतजमीन ओलीताखाली येऊ शकेल. नदी- नाले न अडविल्यामुळे अशी गावे पावसाळी शेती संपली की, रोजगाराच्या शोधात इतरत्र जातात.
मग शासकीय योजना कधी, कोणासाठी, किती वेळा राबवायच्या हा प्रश्न निर्माण होतो. यासाठी लागणारा शासकीय निधी कामी येतो, मग यासाठी करावं तरी काय म्हणून अनेक प्रश्न उपस्थित होतात.
काही वर्षापासून पेठ, सुरगाणा भागात ज्यापद्धतीने जल परिषदेच्या माध्यमातून पाणी विषयावर जलपरिषद, जलसंवाद, जलथाँन घेऊन हि चळवळ उभी राहत आहे.
त्यामुळे आदिवासी भागातील मुख्य समस्या आणि येथील बांधवांच्या अधोगतीचं मुख्य कारण असलेल्या पाणी या विषयावर जनजागृती ते प्रत्यक्ष मोहीमा हाती घेत शासनाकडे, लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा करत याकामी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. पाणी मिळाले तर शेती बहरेल.
शेतीमुळे उत्पन्न वाढून रोजगारही उपलब्ध होईल आणि त्यामुळे स्थलांतर न होता आरोग्य समस्या तसेच मुलांच्या शिक्षणाकडे पालकांचे लक्ष राहील. त्यामुळे एकीकडे देश स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत महासत्ता होण्याचं स्वप्न बघत असताना गावाकडच्या बांधवांची ही मुलभूत समस्या सोडवण्यासाठी सुरू असलेली धडपड सरकारने लक्षात घेऊन ठोस उपाययोजना करून कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
"पेठ, सुरगाणा तालुक्यातील पाणी टंचाई, शेतीला, पशु, पक्षी, पाणी द्यायचे असेल आणि यावर मात करायची असेल, तर दमणनदी, नार, पार नदी छोटे छोटे ओहोळ यांना कायस्वरूपी लहान सिमेंट प्लग बंधारे बांधून गावाला सक्षम करणे आवश्यक आहे, यासाठी निधी उपलब्ध होऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा."
- राकेश दळवी, जलपरिषद मित्र
"पेठ, सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागात रस्ते, वीज, पाणी यांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे; अन्यथा पुढील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
जयराम भोये, उपसरपंच, मनखेड