Nashik News: इंडोनेशियात व्यापार वृद्धीसाठी महाराष्ट्र चेंबरचा संयुक्त उपक्रम : ललित गांधी

Meeting
Meetingesakal

Nashik News : भारत - इंडोनेशिया दरम्यान द्वीपक्षीय व्यापार वृद्धीसाठी इंडोनेशिया वाणिज्य व पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स संयुक्त उपक्रम राबवतील अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी व इंडोनेशियाचे भारतातील महावाणिज्यदूत जनरल एड्डी वर्दोयो यांनी दिली. (Lalit Gandhi statement Joint initiative of Maharashtra Chamber to increase trade in Indonesia Nashik News)

श्री. वर्दोयो यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी आमंत्रित केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.

श्री. वर्दोयो यांनी भारत व इंडोनेशिया यांचे वाणिज्य, पर्यटन व सांस्कृतिक संबंध अतिशय चांगले असल्याचे सांगत उभय देशांमधील व्यापार व पर्यटन वाढीबरोबरच सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आपले कार्यालय प्रभावीपणे कार्य करेल अशी ग्वाही दिली.

व्यापार व पर्यटनासंबंधी संयुक्त कार्यक्रमाच्या कार्यकक्षा निश्‍चितीसाठी ‘महाराष्ट्र चेंबर’ च्या पदाधिकाऱ्यांना इंडोनेशिया भेटीचे निमंत्रण दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Meeting
Navratri 2023: सप्तशृंगी गडावर नवरोत्सवाची तयारी सुरू! प्रशासन लागले कामाला

ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबर तर्फे महाराष्ट्रातील उत्पादने जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी ‘मायटेक्स’ या नावाने आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनांची श्रृंखला सुरू केल्याचे सांगून ६ ऑक्टोबरपासून नाशिक येथे व २० ऑक्टोबरपासून पुणे येथे सुरू होणाऱ्या या प्रदर्शनासाठी इंडोनेशियाचे उद्योजकांचे शिष्टमंडळास आमंत्रित केले.

महावाणिज्यदूत (काऊंन्सिल जनरल) एड्डी वर्दोयो यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केला.

महाराष्ट्रातून कृषी उत्पादने, स्टील, ऑटोकंपोनंटस्, प्लास्टिक उत्पादने इंडोनेशियात निर्यात करण्यासाठी तसेच इंडोनेशियामधून खाद्यतेल, कॉफी, चॉकलेट, बांधकाम साहित्य यांच्या आयातीच्या संभावना निश्‍चित करण्यासाठी शिष्टमंडळाने १४ ते २० ऑक्टोबरदरम्यान इंडोनेशियाला भेट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

चेंबरचे उपाध्यक्ष कांतिलाल चोपडा, सरव्यवस्थापक सागर नागरे, कार्यकारी अधिकारी नितीन भट आदी उपस्थित होते.

Meeting
National Peoples Court: नाशिक उद्या राष्ट्रीय लोकअदालत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com