Samruddhi Expressway : मोठा अनर्थ टळला! नागपूर, मुंबई समृद्धी महामार्गावर दरड कोसळली; सुदैवाने वाहन नव्हते
No Casualties Reported in Igatpuri Landslide Incident : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरी आणि कसारादरम्यान मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. तात्काळ कारवाईमुळे वाहतूक पुन्हा सुरू झाली.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गवरील इगतपुरी ते कसारा दरम्यान चॅनल नंबर 636 या ठिकाणी बोगद्याच्या पुढे मुंबई वाहिनीवर काल रात्री 7:35 च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात दरड कोसल्ल्याने मुबईकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटात विस्कळीत झाली.