Nashik Kalaram Mandir : रामरक्षा पठणासाठी उसळली गर्दी; श्री काळाराम मंदिरात महिलांसह विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

अयोध्येतील श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात कालपासून आनंद उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Nashik Kalaram Mandir
Nashik Kalaram Mandir esakal

Nashik Kalaram Mandir : अयोध्येतील श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात कालपासून आनंद उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज सामुहिक रामरक्षा व भीमरूपी पठणाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महिलांसह पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. सायंकाळी २१ जोडप्यांच्या हस्ते श्रीरामप्रभूंची महाआरती करण्यात आली. (Large participation of students including women in Sri Kalaram Temple for Ramraksha Pathan nashik news)

अयोध्येतील श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे तीनदिवसीय आनंद उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रीरामास सामुहिक ढोलवादनाद्वारे प्रदक्षिणा घालण्यात आली.

दुपारच्या सत्रात सुंदरकांडचा लाभ भाविकांनी घेतला. सायंकाळी अयोध्येत कारसेवा केलेल्या मान्यवरांचा मंदिराच्या आवारात विश्‍वस्त मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

महोत्सवात रविवारी (ता.२१) सकाळी सातला वेदमूर्ती भालचंद्रशास्त्री शौचे यांच्या संचलनाखाली सामुहिक रामरक्षा व भीमरूपी स्तोत्राचे सामुहिक पठण झाले. यावेळी पुणे विद्यार्थी गृहासह अंधशाळेचे विद्यार्थी व महिला अशी दोन ते अडीच हजारांची उपस्थिती होती.

दुपारी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सारंग गोसावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीराम स्वागत भजन सादर केले तर सायंकाळी स्थानिक कलावंतांनी सादर केलेल्या गीत रामायणालाही उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Nashik Kalaram Mandir
Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाअधिवेशन; आज गोदा आरती

सामुहिक महाआरती

श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिस्थापनेच्या पूर्वसंध्येला सायंकाळी साडेसहा वाजता २१ जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. महाआरतीसह भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री काळाराम मंदिर देवस्थान व राष्टीय स्वयंसेवक संघातर्फे या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवात उद्या सायंकाळी सहा वाजता दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कारसेवकांचा सत्कार

दरम्यान १९९२ साली झालेल्या कारसेवेत सक्रीय सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचा श्री काळाराम मंदिर देवस्थानच्या विश्‍वस्तांतर्फे मंदिराच्या आवारात सत्कार करण्यात आला.

सत्कार झालेल्या कारसेवकांत शरद जाधव, अविनाश शिरसाठ, रामभाऊ महाजन, एकनाथराव शेटे, राममंदिराचे निर्माण होत नाही तोवर चप्पल न घालण्याचा संकल्प केलेले लालचंद टाटिया, ज्ञानेश्‍वर गायकवाड, सतीश शुक्ल, धनंजय पुजारी, बाबा फडके आदींचा समावेश आहे.

Nashik Kalaram Mandir
Nashik Kalaram Mandir : शहरातील मंदिरांना चोख पोलिस बंदोबस्त; काळाराम मंदिरात भाविकांची होणार गर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com