esakal | RTE Admission : प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे वेटिंग संपणार?
sakal

बोलून बातमी शोधा

rte admission

RTE Admission : विद्यार्थ्यांचे वेटिंग संपणार?

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या संदर्भात जाहीर केलेल्‍या सोडतीत नावे असलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्‍चितीसाठी शुक्रवार (ता. ९) अखेरची मुदत असणार आहे. दरम्‍यान, रिक्‍त जागांवर प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळते की पुन्‍हा एकदा मुतदवाढ दिली जाते याकडे सर्वच पालकांचे लक्ष लागून आहे. (last-date-for-confirmation-of-admission-in-RTE-admission-process-nashik-marathi-news)

आरटीई प्रवेशप्रक्रियेत प्रवेशनिश्‍चितीची आज अंतिम मुदत

गेल्‍या महिन्‍यापासूनच खासगी शाळांमध्ये अध्ययन प्रक्रियेला सुरवात झाली आहे. कोरोना महामारीमुळे शाळांचे प्रवेशद्वार बंद असले तरी ऑनलाइन माध्यमातून शिक्षण सुरू झालेले आहे. दुसरीकडे गेल्‍या वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील आरटीईअंतर्गत प्रवेशप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. अद्याप मोठ्या प्रमाणावरील जागांवर प्रवेश निश्‍चित झालेले नाहीत. यापूर्वीच्‍या वेळापत्रकानुसार सोडतीत नावे असलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली होती. त्‍यानंतर दोनदा मुदतवाढ दिली गेली. आता प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी द्यावी. तसेच लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्‍यान, नाशिक जिल्ह्यात ४५० शाळांतील चार हजार ५४४ जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध केल्‍या होत्‍या. या जागांसाठी १३ हजार ३३० अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. सोडतीत चार हजार २०८ विद्यार्थ्यांच्‍या नावांचा समावेश होता. गुरुवारी (ता. ८) सायंकाळी उशिरापर्यंत दोन हजार ५११ प्रवेश निश्‍चित झाले होते. आता पुढील प्रक्रियेला गती मिळावी, अशी अपेक्षा व्‍यक्‍त होते आहे.

हेही वाचा: नाशिक शहर बससेवा : पहिल्याच दिवशी हजारावर नाशिककरांचा प्रवास

हेही वाचा: 'मी ईडीचा प्रवक्ता नाही', फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया

loading image