esakal | नाशिक शहर बससेवा : पहिल्याच दिवशी हजारावर नाशिककरांचा प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik City Link

नाशिक शहर बससेवा : पहिल्याच दिवशी हजारावर नाशिककरांचा प्रवास

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेकडून गुरुवार (ता. ८)पासून सुरू झालेल्या बससेवेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर १६४ फेऱ्यांमधून एक हजार ७९ प्रवाशांनी प्रवास केला. नाशिक महानगर परिवहन कंपनीच्या सिटीलिंक सेवेचा गुरुवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. (thousands of citizens traveled by Nashik City bus on the first day itself)


दुपारी दोननंतर कार्यक्रम आटोपल्यानंतर तत्काळ बसचे शेड्यूल निश्चित करून नाशिककरांसाठी सेवा सुरू करण्यात आली. एकूण नऊ मार्गांवर २७ बस दुपारनंतर सोडण्यात आल्या होत्या. एकूण १६४ फेऱ्या झाल्या. यात एक हजार ७९ प्रवाशांनी प्रवास केला. दुपारनंतर शेड्यूल चालू केले होते. सायंकाळी साडेसातपर्यंत शहरातील प्रमुख मार्गांवरून बस धावल्या. शुक्रवार (ता. ९)पासून नियमित नऊ मार्गांवर ५० बस सोडल्या जाणार असल्याची माहिती सिटीलिंक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: चणकापूरमधून कळवण शहराला 2.25 दशलक्ष घनमीटर पाणीशालिमार ते नाशिक रोड मार्गाला सर्वाधिक प्रतिसाद

लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर नाशिककरांना बससेवेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातही आयटीएमएस ही आधुनिक सुविधा, तसेच मोबाईल ॲपद्वारे बसची माहिती सहज मिळविता येणे शक्य असल्याने नागरिकांनी ॲप डाउनलोड करून घेतले. पहिल्याच दिवशी बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहत, तसेच शालिमार ते नाशिक रोड या मार्गाला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे.

(thousands of citizens traveled by Nashik City bus on the first day itself)

हेही वाचा: 'मी ईडीचा प्रवक्ता नाही', फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया

loading image