Lakshman Savaji : राज्यात परतू लागलेत उद्योग; विरोधकांना लक्ष्मण सावजींचा टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lakshman Savaji

Lakshman Savaji : राज्यात परतू लागलेत उद्योग; विरोधकांना लक्ष्मण सावजींचा टोला

नाशिक : अजंग- रावळगाव औद्योगिक वसाहतीतील २७ प्रकल्पांचे भूमीपूजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. याच पार्श्‍वभूमीवर भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी राज्यात उद्योग परतू लागलेत, असा टोला विरोधकांना लगावला आहे. श्री. सावजी म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना उद्योग क्षेत्राची अडवणूक झाली. (Laxman Savajis attacking Statement on opposition Industries returning to state nashik political news)

सरकारच्या अनुदानासाठी, सवलतीसाठी सरळ मार्गाचा अवलंब केला जात नव्हता. त्यामुळे गुंतवणूकदारांना राज्यात उद्योग सुरु करण्यासाठी अनुकूल वातावरण नाही, अशी खात्री पटल्याने वेदांत-फॉक्सकॉन, सॅफ्रन अशा प्रकल्पांनी राज्यातून काढता पाय घेतला.

शिवाय राज्यात उद्योग येण्यास तयार नव्हते. आता शिंदे-फडणवीस सरकारकडून खात्री उद्योग क्षेत्राला वाटू लागली आहे. राज्यातील गुंतवणुकीचा विश्‍वास वाटू लागला आहे. म्हणून दावोसमधील परिषदेत गुंतवणुकीचे एक लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार झाले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

मालेगावमधील प्रकल्पांच्या माध्यमातून जवळपास पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन दोन हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. सूक्ष्म आणि लघू उद्योग सुरु करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर राज्य सरकारचा भर आहे.

त्याचा भाग म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत राज्यात २५ हजार उद्योजक तयार करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत सुरवातीच्या तीन वर्षात केवळ १७० कोटी अनुदान दिले गेले. सहा महिन्यात ५५० कोटीचे अनुदान दिले गेले आहे, असेही श्री. सावजी यांनी सांगितले.