Nashik News: लक्ष्मीकांत साताळकर यांनी पदभार स्वीकारला

Laxmikant Satalkar taking charge of the post of Municipal Administration Deputy Commissioner from Shrikant Pawar
Laxmikant Satalkar taking charge of the post of Municipal Administration Deputy Commissioner from Shrikant Pawaresakal
Updated on

Nashik News : महापालिकेचे वादग्रस्त प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी जळगावचे उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

साताळकर यांनी बुधवारी (ता. १४) उपयुक्त श्रीकांत पवार यांच्याकडून उपायुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. (Laxmikant Satalkar assumed charge at nmc Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Laxmikant Satalkar taking charge of the post of Municipal Administration Deputy Commissioner from Shrikant Pawar
NMC Fire Department : 1 लाख लोकसंख्येमागे 6 अग्निशमन कर्मचारी; महापालिकेची दयनीय अवस्था

महापालिकेत उपायुक्त पदावर दोन वर्षांपेक्षा अधिक काळ काम करता येत नाही. मात्र, मनोज घोडे- पाटील यांनी तब्बल चार ते साडेचार वर्षे या पदावर काम केले. त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यांच्या कार्यकाळामध्ये देण्यात आलेल्या पदोन्नत्या वादग्रस्त ठरल्या.

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी समिती बसवून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, घोडे- पाटील यांच्या जागेवर प्रशासन उपायुक्त म्हणून साताळकर यांची नियुक्ती करण्यात आली.

साताळकर यांना महसूल या त्यांच्या मूळ विभागातून कार्यमुक्त न केल्याने त्यांना हजर होता येत नव्हते. महसूल विभागातून एकतर्फी कार्यमुक्त करत नगर विकास विभागाकडे त्यांची सेवा वर्ग केल्याने बुधवारी साताळकर हे नाशिक महापालिकेच्या प्रशासन उपायुक्त पदावर रुजू झाले.

Laxmikant Satalkar taking charge of the post of Municipal Administration Deputy Commissioner from Shrikant Pawar
NMC School : महापालिकेच्या शिक्षकांना 1 तास Extra! विद्यार्थी टक्का, गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com