लुटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अटकेत; अनेक गुन्ह्यांची उकल

crime
crimeesakal

पेठ (जि.नाशिक) : नाशिक-पेठ मार्गावरील (nashik-peth highway) घाटात रात्रीच्या वेळी वाहनास अडवून मारहाण करून ऐवज लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्यास अटक केली असून साथीदार दोन फरार असल्याची माहिती पेठचे पोलिस निरीक्षक राधेश्याम गाडे पाटील यांनी दिली.(leader-of-looting-gang-was-arrested-nashik-marthi-news)

लुटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अटकेत

नाशिक-पेठ मार्गावरील कोटंबी घाटातून २२ मेस रात्री दहाच्या सुमारास बेहेडमाळ (ता. पेठ) येथील रहिवाशी असलेले सोमनाथ जाधव दुचाकीने जात असताना तीन संशयितांनी दुचाकीचा पाठलाग करून कोटंबी घाटात दुचाकीला धक्का देऊन पाडले. हातातील दंडुक्याने हाता-पायावर डोक्यावर मारहाण करून जखमी करत (एम एच १५, एफ ३६१७) पॅशन प्रो, गळ्यातील सोन्याची चेन व मोबाईल घेऊन पलायन केले. जखमी जाधव यांना पेठकडे येणाऱ्या वाहनाने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दोन संशयित फरारी; अनेक गुन्ह्यांची उकल

घाट विभागात वारंवार वाहने अडवून मारहाणीच्या घटना घडत असल्याने जिल्हा यंत्रणेकडून मोबाइल ट्रॅकिंगचा आधार घेऊन तपासाची दिशा ठरवत मोबाईलनेच गुन्हेगारांपर्यंत पोचविले. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राधेश्याम गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, टोळीची व्याप्ती मोठी असल्याची खातरजमा झाल्याने तसा अहवाल वरिष्ठांना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेद्र कुंटे यांनी सांगितले.

crime
कोविड सेंटरमधील रुग्ण जेवण फेकताएत कचऱ्यात; धक्कादायक प्रकार समोर

गुन्ह्यांची कबुली

गुन्ह्यातील सूत्रधार भगवान टोंगारे (रा. कोचरगाव, दिंडोरी) चोरलेली दुचाकी विक्रीसाठी उमराळे येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. कोचरगावकडून येणारी मोटरसायकल अडवून संशयिताकडे गाडीची कागदपत्रे, परवान्याची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशयित भगवान टोंगारे यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ताब्यात घेतले. चौकशीअंती टोळीने २२ मेस कोटंबी घाटात तर २३ मेस मोखाडा रस्त्यावरील अंबोली घाटातील भांगेदेवाचे मंदिराजवळ ड्रिमयुगा दुचाकीस्वारास या पद्धतीने लुटून वाहनासह पळ काढला होता. २५ मेस हरसूलजवळील वाघेरे घाटातही दुचाकीस्वाराची लूट केल्याची कबुली संशयित टोंगारे याने दिली. त्याचे दोन साथीदारही फरारी झाले आहेत. या टोळीने यापूर्वी नाशिक-पेठ मार्गावरील ट्रक चालकांनाही लुटल्याची कबुली दिली.

crime
पदवीधर तरुणाने बांधली दिव्यांग मुलीशी रेशीमगाठ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com