

Panic in Nashik as Leopard Seen Inside Bhosala Military School Students Given Half Day Search On
Esakal
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. काही ठिकाणी बिबट्यानं हल्ला केल्यानं अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. यानंतर राज्याच्या वनमंत्र्यांनी बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेशही दिले. दरम्यान, आता नाशिकमध्ये शाळेच्या आवारात बिबट्या घुसल्याची घटना समोर आलीय. बिबट्या दिसताच मोठा गोंधळ झाला आणि धावपळ उडाली. बिबट्याच्या दहशतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेला दुपारनंतर सुट्टी जाहीर केली.