Nashik Leopard : कोंबड्याची शिकार करायला गेला बिबट्या अन् स्वत:च खुराड्यात कैद झाला

Leopard in Nashik
Leopard in NashikSakal

Nashik News : बिबट्याला कोंबड्याच्या खुराड्यात कोंडल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? मात्र नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवी बेज शिवारामध्ये हा प्रकार घडला आहे. यामध्ये कोंबड्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याच्या बछड्याला नागरिकांनी खुराड्यातंच कोंडलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, नवी बेज येथील एका घराजवळ असलेल्या खुराड्यातील कोंबड्याची शिकार करण्यासाठी बिबट्याचा बछडा आला होता. पण कोंबड्यांच्या खुराड्यात घुसल्यानंतर शेतकऱ्याने शिताफीने खुराड्याचं दार बंद केलं आणि बछडा आत कैद झाला. वनविभागाला ही माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बछड्याला पिंजऱ्यामध्ये कैद केले.

Leopard in Nashik
Pune Chandani Chowk : चांदणी चौकाचे बांधकाम पूर्ण! पाहा भव्यदिव्य पुलाचा ड्रोन Video

दरम्यान, वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आहे. तर या लहान बछड्याला कोंबड्याची शिकार करणे चांगलंच महागात पडल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे. सोशल मीडियावर पिंजऱ्यात असलेल्या बछड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com