निखिल रोकडे, नाशिक: जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी वन विभागाने नवा पर्याय अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून नाशिक जिल्ह्यातील १०० गावांमध्ये वीजप्रवाह असलेले सौर कुंपण बसविण्याचा प्रस्ताव पुढे आला. या कुंपणात सौम्य विजेचा प्रवाह राहणार असून, त्यात बिबट्या अडकणार नाही. मात्र, कुंपण ओलांडणे त्याला शक्य होणार नाही.