Leopard News : बिबट्यांची पिंजऱ्यांना हुलकावणी; ग्रामीण भागातील नागरिकांचे पशुधन धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leopards

Leopard News : बिबट्यांची पिंजऱ्यांना हुलकावणी; ग्रामीण भागातील नागरिकांचे पशुधन धोक्यात

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांसह वनविभागापुढे यावर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागातर्फे लावलेल्या पिंजऱ्यांना थेट बिबट्यांकडूनच हुलकावणी दिली जात असल्याने वनविभागाचे प्रयत्न देखील परते थकले आहे.

दिंडोरी तालुक्यात कादवा नदी व कोलवण नदीमुळे उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. उसामुळे निफाड तालुक्यानंतर दिंडोरी हे बिबट्याचे माहेर घरच झाले आहे. येथील उसामध्ये मादी आपल्या बछड्यांसह मुक्त विहार करत आहे. बिबट्यांच्या या मुक्त संचारामुळे मात्र येथील ग्रामस्थ दररोज भीतीच्या छायेत वावरत आहे.

हेही वाचा: Leopard Attack : त्र्यंबकेश्वर येथे बिबट्याच्या भक्षस्थानी सापडला चिमुरडा

ग्रामीण भागात बिबट्यांचा मुक्त संचार मात्र शेतात असलेल्या पशुधनांसह वसतींवरील लहान मुले, पाळीव प्राणी यांच्या जीवावर उठला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामीण भागातील अनेक गावे, वस्तीवर राहणारे लोक यांना सायंकाळनंतर घराबाहेर पडणे मुश्‍किल बनले आहे. दिंडोरी, कोलवण नदी परिसरातील वाघाड, निळवंडी, पाडे, वलखेड, हातनोरे, निगडोंळ, कादवा नदी परिसरातील नळवाडी, पिंपरखेड, खेडले, करंजवण, ओझे, लखमापूर, दहेगाव, वागळुद, म्हेळुस्के, कादवा माळूगी, अवनखेड, परमोरी या गावामध्ये बिबट्याने धुमाकुळ घालून आपली दहशत निर्माण केली.

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

बिबट्यांकडून आतापर्यंत अनेक लहान मुले, शेळ्या, कुत्रे, कोंबड्या, वासरे यांच्यावर हल्ले करत त्यांना जखमी व ठार केले आहे. निळवंडी येथील शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला करत ठार केल्यामुळे मळ्यात राहणारे शाळकरी मुलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यामुळे रात्री शेतात जाऊन पिंकाना पाणी देणे देखील अडचणींचे ठरत आहे. बिबट्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे.

हेही वाचा: Leopard Cubs : आईच्या कुशीत पुन्हा विसावणाऱ्या बछड्यांचे शतक!

पिंजऱ्यांना हुलकावणी

बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणी येथील नागरिकांच्या मागणीनुसार तत्काळ वनविभागाकडून पिंजरा लावला जात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या मागावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यांना बिबट्यांनी हुलकावणी दिली आहे. भविष्यात 'पाण्यात राहून माशांशी वैर नको' या उक्ती प्रमाणे जनतेला बिबट्या सोबत जुळून घ्यावे लागत असले तरी बिबट्या बरोबर ग्रामस्थांना दररोज लपा झपीचा खेळ खेळावा लागत आहे.

टॅग्स :NashikLeopard