बालकाचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद

leopard
leopardesakal
Updated on

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यातील काळुस्ते दरेवाडी शिवारात एक सहा वर्षीय बालकाचा बळी घेणारा व दुसऱ्या बालकावर झडप घालून त्याला जखमी करणारा तसेच गेल्या १२ दिवसांपासून परिसरातील नागरिकांना भयभीत वातावरणात जेरीस आणणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला. १२ दिवसांपासून पिंजऱ्यालाही हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाला पिंजऱ्याचे स्थलांतर करून दुसऱ्या जागेत पिंजरा हलवावा लागला होता. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांना काहीसे दिलासादायक वाटले असले तरी बिबट्यासोबत बछडेही असल्याने नागरिकांची भीती कायम आहे.

बिबट्याचा पिंजऱ्याला चकवा

"बिबटेच बिबटे चोहीकडे" असे वातावरण असलेल्या इगतपुरी तालुक्यात काळुस्ते दरेवाडी शिवारात १८ ऑक्टोबर रोजी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय दीपक विठ्ठल गावंडा या शाळकरी बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याचा बळी घेतला तर दुसऱ्याच दिवशी याच बिबट्याने आईसोबत अंगणात खेळणा-या कार्तिक घारे या सहा वर्षीय बालकावरही झडप घातली होती. मात्र त्याच्या आईने जखमी अवस्थेत बिबट्याच्या तावडीतून मुलाला सोडवले होते.
या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी चार पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते, अनेक प्रयोगही करण्यात आले होते, तरीही बिबट्या पिंजऱ्याकडे येण्यास धजावत नव्हता. १२ दिवस उलटूनही बिबट्या पिंज-यापासून दूर जात असल्याने नागरिकांची भीती वाढत होती तर वनविभागही काळजीत होता.

leopard
विज तोडल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा भाजपचा इशारा

बिबट्या पाहण्यासाठी एकच गर्दी

अखेर पिंजऱ्याची जागा बदलली त्यामुळे आज रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या आशेने आलेल्या बिबट्याने अलगत पिंजऱ्यात शिरकाव केला अन् बिबट्या जेरबंद झाला. सकाळी ही बाब ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांना समजताच नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी एकच गर्दी केली.

''एक बिबट्या जेरबंद केला म्हणून वन विभागाने समाधान मानू नये इगतपुरी तालुक्यातील अनेक बिबटे अजूनही मोठया प्रमाणात असून अनेक आदिवासी बांधवांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुढे एकही आदिवासींचा जीव जाणार नाही याची दक्षता वन विभागाने घ्यावी.'' - भगवान मधे, जिल्हा सरचिटणीस, श्रमजीवी संघटना.

leopard
लाकूड माफियांचे धाबे दणाणले; वनविभागाने केली सिनेस्टाईल कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com