Nashik : टाकेद परिसरात बिबट्या जेरबंद

Leopard jailed by forest department.
Leopard jailed by forest department.esakal

सर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : राहुलनगर बारशिंगवे (ता. इगतपुरी) येथे बिबट्याला जेरबंद करण्यात इगतपुरी वन विभागाला अखेर यश आले. राहुलनगर येथील दुर्गादेवी टेकडीवर बिबट्याला वनविभागाने जेरबंद करून ताब्यात घेतले. बिबट्याला इगतपुरी येथे नेण्यात आले. (Leopards jailed in taked area Nashik Latest Marathi News)

Leopard jailed by forest department.
Nandurbar : म्हैस नदीवरील धरण ओंसडले

इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वन परिमंडलाधिकारी भाऊसाहेब राव यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक स्वाती लोखंडे, गोरख बागूल, फैजअली सय्यद, माऊली, वनमजूर दशरथ निर्गुडे, गोविंद बेंडकोळी, भोरु धोंगडे, धोंडीराम पेढेकर, पुनाजी कोरडे, अर्जुन मदगे यांनी बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला.

या बिबट्याने काही दिवसांपूर्वीच वासाळी येथील कचरवाडी शिवारात एका शेतकऱ्याच्या नऊ शेळ्या ठार केल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी वासाळी गावात बिबट्याने दहशत माजवली होती. यामुळे परिसरातील झापवस्तीसह गाव वसाहतीमध्ये राहणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.

ताब्यात घेतलेल्या बिबट्याला ट्रॅक्टरद्वारे इगतपुरी वन विभाग कार्यालयात नेण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. इगतपुरी तालुक्यात विविध गावांमध्ये बिबट्याची दहशत आहे, तेथील शेतकरी व ग्रामस्थांनी स्वतःचे रक्षण करावे, रात्री कुठेही फिरू नये व मदतीसाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाचे अधिकारी चेतन बिरारीस यांनी केले आहे.

Leopard jailed by forest department.
Nayak Ganesh Jagtap Death : शाश्रृनयनांनी नायक जगतापांना अखेरचा निरोप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com