Wedding News : कमी खर्चिक, पारंपरिक संबळला लग्नांत पसंती; वादकांना अच्छे दिन

Igatpuri: Mandav and later Sambal troupe playing sambal in traditional way during wedding ceremony
Igatpuri: Mandav and later Sambal troupe playing sambal in traditional way during wedding ceremonyesakal

Nashik News : सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू आहे. सोबतीला कडक उन्हाचा तडाखा असला तरी जोरदार विवाह होत आहे.

यात कमी खर्क आणि पारंपरिक वाद्य असलेल्या संबळला यंदा विशेष मागणी राहिली आहे. आधुनिकतेच्या जमान्यात डिजेचा दणदणाट असला तरी या वाद्यांना विशेष पसंती दिली जात आहे.

कोरोनामुळे दोन तीन वर्षापूर्वी जवळपास सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला होता. यात लग्नसराईला सुध्दा चांगलाच फटका बसला होता. मोजक्या लोकांमध्येच म्हणजे छोटेखानी लग्न समारंभ करण्याचे फॅड आले होते. (Less expensive traditional Sambal preferred in marriage Craze even in age of DJ Achhe din to musicians Nashik News)

मात्र सध्या धुमधडाक्यात होत असलेल्या विवाहसोहळ्यामुळे सर्व वातावरण उत्साहाचे आहे. विवाहसोहळ्यांसाठी वाजंत्रीला जास्त महत्व असते.

सध्याच्या हायटेक, डिजिटल व डिजेच्या जमान्यात कमी खर्चीक आणि सुरेल व पारंपरिक संबळ वाजंत्रीला लोकांची विशेष पसंती मिळत आहे. यामुळे संबळ वादकांना सध्या तरी ‘अच्छे दिन’आले आहेत.

या वादकांना कोरोनाकाळात अन्य व्यवसाय, शेती, मजुरी किंवा अगदी मिळेल ते काम करण्याची वेळ आली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Igatpuri: Mandav and later Sambal troupe playing sambal in traditional way during wedding ceremony
Jalgaon News : दोन्ही बाळ मूळ मातांच्या कुशीत विसावली!

आता मात्र लग्नसोहळ्यासाठी चार वादक असलेल्या संबळ वाजंत्रीला मागणी वाढत आहे. काही वर्षापूर्वी लग्नसोहळा म्हटले की सनई-चौघडे, संबळ वाजंत्री या पारंपारिक साधनांनाच विशेष पसंती मिळत असे. तिच स्थिती पुन्हा आल्याचे दिसून येत आहे.

"संबळ वाजंत्रीचा आमचा पारंपरिक व्यवसाय असून, गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी आमचा परिवार या व्यवसायात आहे. संबळवादक, सूर व दोन पिपाणी वादक असे चार वादकांचे पथक आहे.

एका लग्नाची सुपारी आठ ते दहा हजार रूपये असते. बॅण्ड व डिजेच्या तुलनेत संबळ कमी खर्चीक वाजंत्री आहे. यामुळे लोकांची मागणी कायम असते. या कलेची जोपासना होण्याच्या उद्देशाने आम्ही आमच्या मुलांनादेखील ही वाद्ये शिकविण्याचा प्रयत्न करीत आहोत."

- शिवनाथ भगरे, संबळवादक

Igatpuri: Mandav and later Sambal troupe playing sambal in traditional way during wedding ceremony
Agriculture News : साडेपाच लाख हेक्टरवर होणार कपाशीचा पेरा; खरिपासाठी शेतकरीराजा होतोय सज्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com