Panchavati Express : पंचवटी एक्स्प्रेसमध्ये सुरू होणार वाचनालय! वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी अनोखे अभियान

Built-in cupboard for library.
Built-in cupboard for library. esakal

Nashik Panchavati Express : पंचेचाळीस वर्षांहून अधिक प्रवाशांना जिवाची मुंबई करून आणणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये सध्या वाचनालय सुरू करण्याची अनोखी संकल्पना रेल्वेच्या प्रवाशांनी राबवली आहे.

दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकसहभागातून एमएसटी कोचमध्ये नवीन कपाट आणून त्या ठिकाणी पुस्तके जमा करायला सुरवात केली आहे. (Library to be opened in Panchavati Express nashik news)

यातून प्रवासाबरोबरच पुस्तकांची मैत्री निर्माण व्हावी, हा अनोखा प्रयत्न प्रवासी करत असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नाशिकहून सकाळी सव्वासातला पंचवटी एक्स्प्रेस निघते. अकराला ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोचते. त्यानंतर सव्वासहाला पुन्हा सीएसटीहून निघते, तर रात्री साडेनऊला प्रवाशांना नाशिकमध्ये सोडते.

या प्रवासादरम्यान प्रवाशांना चांगली पुस्तके वाचता यावीत आणि प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रवाशांनी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये नवीन वाचनालय सुरू करण्याची अनोखी संकल्पना अमलात आणली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Built-in cupboard for library.
Nashik News : चोरट्यांनो या, पिंपळगावात आपले स्वागत आहे! सुरक्षेचा कडलोट झाल्याने या गावात हा फलक लावणेच बाकी...

या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असून, हिंदी, मराठी, इंग्रजी पुस्तकांचा खजिना या एमएसटी कोचमध्ये असणार आहे.

वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि प्रवाशांना नवनवीन पुस्तकांची ओळख व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. प्रवासी ही पुस्तके घरी घेऊन जाऊ शकतात. प्रत्येक प्रवाशाने काही महत्त्वाची पुस्तके दान करण्याचे ठरवले असून, या वाचनालयात दिवसेंदिवस पुस्तकांची वाढ होत आहे.

"वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी आम्ही हा अनोखा प्रयोग राबविला आहे. यातून प्रवास सुखकर होण्याबरोबरच जीवनाला आकार देणारी काही नवीन पुस्तके आमच्या संग्रहात समाविष्ट करीत आहोत. लोकसहभागातून हा उपक्रम आम्ही अमलात आणत आहोत." - रवींद्र सोनार, प्रवासी, मुंबई

Built-in cupboard for library.
Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाताय? या वाहनांना 3 दिवस प्रवेशबंदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com