esakal | रात्रीची वेळ..सर्वत्र सामसूम..लांबून चालून येणारा युवक अचानक चक्कर येऊन कोसळतो..अन् मग...
sakal

बोलून बातमी शोधा

mhasrul yuvak.jpg

रात्रीची वेळ... सर्वत्र सामसूम... लांबून चालून येणारा एक युवक अचानक चक्कर येऊन कोसळतो... जवळच नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांचे लक्ष त्याच्याकडे जाते... ते तत्काळ धाव घेतात आणि त्याला उठविण्याचा प्रयत्न करतात... पण..

रात्रीची वेळ..सर्वत्र सामसूम..लांबून चालून येणारा युवक अचानक चक्कर येऊन कोसळतो..अन् मग...

sakal_logo
By
योगेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / म्हसरूळ : रात्रीची वेळ... सर्वत्र सामसूम... लांबून चालून येणारा एक युवक अचानक चक्कर येऊन कोसळतो... जवळच नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांचे लक्ष त्याच्याकडे जाते... ते तत्काळ धाव घेतात आणि त्याला उठविण्याचा प्रयत्न करतात... शुद्धीवर आल्यावर त्याला अन्नपाणी देतात. शेकडो मैल पायी चालल्यामुळे त्याला चक्कर आल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णवाहिकेतून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करतात. 

रुग्णवाहिका नसल्याने तीन तासांचा विलंब 
"लॉकडाउन'मुळे मोलमजुरीसाठी अनेक ठिकाणी परप्रांतीय अडकून पडले आहेत. बुधवारी (ता.29) मध्यरात्री एक युवक दिंडोरी रोडवरील मराठी शाळेसमोर चक्कर येऊन पडला. नाकाबंदीवर असलेल्या पोलिस व स्वयंसेवकांनी त्याला पाणी व जेवण दिले. बिटमार्शल म्हणून कार्यरत असलेल्या पोलिसदादांनी त्याची चौकशी केली असता तो युवक मूळ बिहार येथील असून, मुंबईकडून घरी जात असल्याचे त्याने सांगितले. ही बाब वरिष्ठांना कळविली आणि 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस दूरध्वनी केला. परंतु त्यावर कार्यरत डॉक्‍टरने युवकास कोरोनाची लक्षणे दिसतात का, असा उलट प्रश्‍न केला. ही बाब महापालिकेच्या डॉक्‍टरांना कळवा, असा सल्लाही दिला. जवळपास दोन तासांनंतर रस्त्यावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकेला थांबवून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केली. त्यावर तो चालक थांबला. परंतु तो एकटाच असल्याने तो त्या युवकास नेण्यास असमर्थ ठरला. शेवटी रात्री साडेबाराला दिंडोरीहून नाशिककडे येणाऱ्या 108 रुग्णवाहिकेस नाकाबंदीच्या ठिकाणी थांबवून त्या युवकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

हेही वाचा > नियती झाली क्रूर! आई..'सगळं सुख तुझ्या पायाशी आणेल मी"...म्हणणारा मुलगा तिच्यासमोर प्राण सोडतो तेव्हा

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "करपलेल्या जखमी पायांनी लांब अंतर कापतोय खरं..पण घरात घेतील ना?"

loading image