esakal | ब्रह्मगिरी अवैध उत्खनन : पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
sakal

बोलून बातमी शोधा

brahmagiri

ब्रह्मगिरी अवैध उत्खनन : पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : ब्रह्मगिरीचे अवैध उत्खनन, संतोषा, भागडी या सह्याद्रीच्याच रांगेतील डोंगरांसह सारूळ येथील अवैध खडी उत्खनानात दोषींवर सात दिवसांत गुन्हे दाखल करा. त्याचा अहवाल माझ्याकडे तत्काळ सादर करा, असे निर्देश २४ ऑगस्टला पर्यावरण राज्यमंत्री बनसोड यांनी दिले होते. त्या निर्देशाला जिल्हा खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे आता ब्रह्मगिरी समितीनेही नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्राद्वारे पर्यावरण राज्यमंत्र्याच्या निर्देशाची आठवण करून दिली.


नाशिक जिल्हा पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. येथील वातावरणही आरोग्यदायी आहे. मात्र, आता या निसर्ग संपन्नतेचा गळा घोटण्याचे काम पैशाच्या हव्यासापायी व्यावसायिकांकडून सुरू झाले आहे. नाशिकची ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वरातील ब्रह्मगिरी डोंगर फोडला जात आहे. सारूळचे डोंगर उद्‍ध्वस्त झाले असून, संतोषा अन् भागडी या दोन्ही डोंगरांकडे आता या खानमाफियांनी आपला मोर्चा वळविला आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला अन् थेट पर्यावरण राज्यमंत्र्यांकडेच धाव घेतली. मंत्र्यांनीही त्याची गंभीर दखल घेत गेल्या आठवड्यात २४ ऑगस्टला मंत्रालयात अधिकारी अन् पर्यावरणप्रेमींची बैठक घेतली. त्यात प्राप्त तक्रारींनुसार या अवैध उत्खननातील दोषींवर सात दिवसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा: नाशिक : तरुणाच्या खून प्रकरणी चार अल्पवयीन संशयित ताब्यात


साधी पाहणी नाही

पर्यावरण राज्यमंत्र्याच्या निर्देशाला आठवडा उलटला, पण अद्याप गुन्हे दाखल करणे तर सोडाच. गौण खनिज विभागाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणीही केली नाही. त्यामुळे पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या आदेशालाच वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम या विभागाकडून झाले आहे. कारवाई केव्हा करणार? यासाठी ब्रह्मगिरी कृती समितीने पुन्हा बुधवारी (ता.१) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना स्मरणपत्राद्वारे आठवण करून दिली आहे. कृती समितीचे अंबरिश मोरे, मनोज बाविस्कर, बेळगाव ढगाचे सरपंच दत्तू ढगे, मनोज साठे, वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष शांताराम महाराज दुसाने आदी उपस्थित होते.

हेही वाचा: २७ हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना अटक

loading image
go to top