रखडलेल्या कामांमुळे स्थानिकांना मनस्ताप | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 रखडलेल्या कामांमुळे स्थानिकांना मनस्ताप

नाशिक : रखडलेल्या कामांमुळे स्थानिकांना मनस्ताप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : गंगाघाटावरील रामकुंडाकडे जाणाऱ्या सरदार चौक ते रामकुंड या रस्त्याचे व गटारीकरण खोलीचे काम दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. त्यामुळे धार्मिक विधीसाठी शहरात आलेल्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहराच्या विविध भागात सध्या स्मार्टसिटीअंतर्गत कामे सुरू आहेत. यात गंगाघाटावरील पावसाळी गटारींच्या कामाचाही समावेश आहे. परंतु, सरदार चौक ते रामकुंड परिसरातील खडक अतिशय कठीण असल्याने रस्ता फोडण्यास जवळपास वर्षभराचा कालावधी लागला.

सध्या गटारीकरणाचे काम पूर्ण झालेले असलेतरी त्यावर अद्यापही काँक्रिटीकरण न केल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गोदावरी व रामकुंडाचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याने या भागात स्थानिकांसह परराज्यातील भाविकांचा वर्षभर मोठा राबता असतो. मात्र, हे काम रखडल्याने भाविकांच्या वाहनांना रामकुंडापर्यंत पोचण्यासाठी अक्षरश आट्यापाट्या खेळत वाहने हाकावी लागतात. त्यामुळे वाहनधारकांसह पायी चालणाऱ्यांनाही जीव मुठीत धरून चालावे लागते.

हेही वाचा: उस्मानाबाद : युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी

गत आठवड्यात आलेल्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. याबाबत स्मार्टीसिटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळत नसल्याचे अनेकांनी सांगितले. हे काम त्वरित पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा स्थानिक पुरोहित, परिसरातील व्यावसायिक व रहिवाशांनी केली आहे. त्यासाठी निवेदनही दिले, परंतु प्रतिसाद नसल्याचा अनुभव आहे.

फरशांचे काम मात्र जोमात

गोदाघाटावरील नदीपात्रालगत स्मार्टसिटीअंतर्गत फरशा बसविण्याचे काम पावसाळ्याच्या सुरवातीपासून सुरू आहे. मध्यंतरी गोदेला आलेल्या छोट्या पुरात हे काम मोठ्या स्वरूपात उद्‌ध्वस्त झाले होते. विशेष म्हणजे हा महापूर नव्हे तर रूटीन पूर होता. त्यातही या कामाने टिकाव धरला नाही. महापुरात या फरशा कशा टिकाव धरणार, असा प्रश्‍न आहे. जी कामे टिकणार नाहीत, असे सर्वांना कळते, तर अशी कामे सुचविणारे व त्यासाठी जोरदार पाठपुरावा करणाऱ्यांनाही समजत नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

loading image
go to top