esakal | धक्कादायक! "गाडीच्या पाठीमागे काय आहे?" पोलीसांनी विचारताच चालकाची बोलतीच बंद..अन् मग...
sakal

बोलून बातमी शोधा

truck eicher.jpg

नाशिकहून मालेगावकडे जाणा-या वाहनांची तपासणी करीत असतांना एका आयशर गाडीला पोलिसांनी हात देवून थांबवली यावेळी चालकास गाडीच्या खाली उतरुन गाडीच्या पाठीमागे काय आहे? याबाबत पोलिसांनी विचारपुस केली असता त्याने काहीएक समाधान कारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी गाडीच्या पाठीमागे जावुन गाडीची तपासणी केली असता धक्काच बसला.

धक्कादायक! "गाडीच्या पाठीमागे काय आहे?" पोलीसांनी विचारताच चालकाची बोलतीच बंद..अन् मग...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / वणी : नाशिकहून मालेगावकडे जाणा-या वाहनांची तपासणी करीत असतांना एका आयशर गाडीला पोलिसांनी हात देवून थांबवली यावेळी चालकास गाडीच्या खाली उतरुन गाडीच्या पाठीमागे काय आहे? याबाबत पोलिसांनी विचारपुस केली असता त्याने काहीएक समाधान कारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी गाडीच्या पाठीमागे जावुन गाडीची तपासणी केली असता धक्काच बसला.

अशा घडली घटना

नाशिक-धुळे महामार्गावर दहाव्या मैलानजीक दिंडोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबेहील फाटा येथे दिंडोरी पोलिसांची कोरोना संदर्भीय नाकाबंदी सुरु असतांना गुरुवार (ता.३०) रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान नाशिककडुन मालेगावकडे जाणा-या वाहनांची तपासणी करीत असतांना आयशर गाडी क्र. (एम.एच.18  बी.जी. 4502) पोलिसांनी हात देवून थांबवली. यावेळी चालकास गाडीच्या खाली उतरुन गाडीच्या पाठीमागे काय आहे? याबाबत पोलिसांनी विचारपुस केली असता त्याने काहीएक समाधान कारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी गाडीच्या पाठीमागे जाऊन गाडीची तपासणी केली. त्यावेळी वाहनात ३६ व्यक्ती गाडीत बसलेल्या आढळून आल्या.  हे सर्व कामगार मध्यप्रदेशातील मूळ रहिवाशी असून ते मुंबई येथून मध्यप्रदेशात पायी जात असतांना त्यांनी रस्त्यात ह्या ट्रकला हात दिला व ट्रक मध्ये बसल्याचे प्रवाशांनी सांगीतले.

माणसांना भाड्याने पैसे घेवुन जात असल्याचे सांगितले

दरम्यान वाहन चालकाकडे पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता सदरची आयसर गाडी ही मी मुंबई येथुन भोपाळ येथे जात असतांना मुंबई, कल्याण, भिवंडी फाटा, इगतपुरी इत्यादी ठिकाणावरुन रस्त्याने मिळुन आलेल्या माणसांना भाड्याने पैसे घेवुन जात असल्याबाबत सांगितले. व सदरची आयशर गाडी ही याकुब खान रा. इंदोर राज्य  मध्य प्रदेश यांच्या मालकीची असल्याचे सांगितले. प्रकरणी मध्यप्रदेशातील चालक मुकेश विपनसिंग याच्यासह उत्तर प्रदेशातील ३७ व्यक्तींना ताब्यात घेवून सदरचे वाहन वरीष्ठांच्या आदेशाने जनता विद्यालय येथे आणन्यात आले. तेथे तहसिलदार कैलास पवार, गटविकास अधिकारी भावसार, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगांव दिंडोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय पथकाने तपासणी केली.

हेही वाचा > नियती झाली क्रूर! आई..'सगळं सुख तुझ्या पायाशी आणेल मी"...म्हणणारा मुलगा तिच्यासमोर प्राण सोडतो तेव्हा

उत्तर प्रदेशातील ३७ जण विलणीकरण कक्षात

यानंतर यासर्वांना वणी येथील केआरटी महाविद्यालय इमारतीत करण्यात आलेल्या विलणीकरण कक्षात हलविण्यात येऊन क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान येथील महाविद्यालयाच्या आवारात तहसिलदार कैलास पवार, वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाडवी यांनी आवश्यक कामगारांना आवश्यक सुचना   दिल्या. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पांडाणेचे वैद्यकिय अधिकारी,  आरोग्य सेवक, वणी ग्रामपंचायतीसे ग्रामविकास अधिकारी जी. आर. आढाव आदींसह कर्मचाऱ्यांना विलनीकरण कक्षात आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. अमीझरा संखेश्वर ट्रस्टच्या वतीने सर्वांच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आली.  सदर प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाणे येथे वाहन चालक व मालका विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक करीत आहेत.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "करपलेल्या जखमी पायांनी लांब अंतर कापतोय खरं..पण घरात घेतील ना?"

मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर नजिक दहावा मैल परिसरात धुळ्याच्या दिशेने कामगारांना घेवून जाणारा आयशर ट्रक पोलिसांनी पकडला असून आयशर ट्रकमधील मध्यप्रदेशातील ३७ कामगारांना ताब्यात घेवून वैद्यकिय सोपस्कार पार करीत वणी येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

loading image