harshwardhan sadgir 1.jpg
harshwardhan sadgir 1.jpg

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आता 'या' मनपाचा ब्रॅन्ड ऍम्बॅसेडर! 

Published on

नाशिक : कुस्तीत दमदार कामगिरी करून महाराष्ट्र केसरीचा मान पटकावणारा हर्षवर्धन सदगीर आता महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छ भारत अभियानांतर्गत ब्रॅन्ड ऍम्बॅसेडर म्हणून घोषित करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते सदगीर यांना पत्र प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र केसरी सदगीर यांनी स्वच्छ व सुंदर नाशिकसाठी सर्वतोपरी मदतीचे आश्‍वासन दिले.

ती कसर हर्षवर्धनने भरून काढली

यावर्षी २०२० मध्ये मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली होती. हर्षवर्धनने आपलाच सहकारी शैलेश शेळकेवर मात करत मानाची गदा पटकावली होती. हर्षवर्धनने अंतिम फेरीत अखेरच्या सेकंदामध्ये बाजी मारत शैलेश शेळकेवर ३-२ ने मात केली होती.नाशिकमध्ये कुस्ती, तालीम संघाची जुनी परंपरा आहे. मात्र, महाराष्ट्र केसरी पदकाला आजवर कोणाला गवसणी घालता आली नव्हती, ती कसर नाशिकच्या मातीत वाढलेला डावपेच शिकलेल्या हर्षवर्धन सदगीरने भरुन काढली. त्यामुळेच सर्वच क्षेत्रातून हर्षवर्धनवर कौतुकाचा वर्षाव झाला होता.

पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. कल्पना कुटे उपस्थित होते. घनकचरा व्यवस्थापन विभागात सॅनिटायझर युनिटचे उद्‌घाटन सदगीर यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 4) झाले. सहाय्यक आरोग्याधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, रमेश बहिरम, जिजा पवार, कमलाकर मल्ले, दत्तात्रय चौधरी, भरत सांगोरे, दयानंद पेंढारकर, रत्नमाला आव्हाड आदी कर्मचारी उपस्थित होते. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com