SAKAL EXCLUSIVE : नाव मेगा भरती, संधी मात्र मर्यादितच

Mega Bharti News
Mega Bharti Newsesakal

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सात हजारांहून अधिक पदांसाठी ‘मेगा’भरती होत आहे. मात्र तांत्रिक त्रुटींमुळे सुमारे पंधरा ते अठरा हजार इतक्‍या मर्यादित उमेदवारांनाच मुख्य परीक्षेची संधी उपलब्‍ध होणार असल्‍याची माहिती समोर येत आहे.

त्रुटींमुळे जागा रिक्‍त राहण्याची भीती व्‍यक्‍त होते आहे. विभागनिहायऐवजी राज्‍यस्‍तरावर गुणवत्तायादी प्रसिद्ध करताना व्‍यापक स्वरूपात उमेदवारांना निवडीची संधी उपलब्‍ध करण्याची मागणी पुढे आली आहे. (Maharashtra Public Service Commission is conducting mega recruitment Update Nashik News)

Mega Bharti News
Nashik News : जिल्हा टॅंकर मुक्तीसाठी आता 'मिशन भगीरथी प्रयास'

स्‍पर्धा परीक्षा समन्‍वय समितीच्‍या माध्यमातून प्रश्‍न उपस्‍थित करत यासंबंधी चळवळ उभी केली जात आहे. एका पदास बारा उमेदवार गुणोत्तराने मुख्य परीक्षेसाठी पात्र केल्यास १५ ते २० हजार उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र ठरतील, असा दावा केला जात आहे. त्‍यामुळे तांत्रिक त्रुटींच्‍या दुरुस्‍तीसाठी संघटना आग्रही आहे.

राज्य सेवा परीक्षेत आयोगास तहसीलदार, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी अशा वेगवेगळ्या विभागातील पदांची मागणीपत्रे प्राप्त होतात. आयोग पूर्वपरीक्षेनंतर विभाग अथवा पदानुसार ‘कट ऑफ’ न लावता राज्यस्‍तरावरील एकच ‘कट ऑफ’ जाहीर केला जातो. उमेदवारांकडून पदांसाठी नोंदवलेले विभागाचे विकल्प केवळ अंतिम निवड यादीवेळी विचारात घेतले जातात.

....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Mega Bharti News
Nashik News :एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरला बहुमान; ‘ARIS’ परिषदेत गौरव

संयुक्त जाहिरातीमध्ये दिलेली प्राधिकरणनिहाय ‘कट ऑफ’ची अट जाचक आहे, अशी तक्रार आहे. देशातील नोकरभरती करणाऱ्या संस्थांची कार्यप्रणाली लक्षात घेता त्‍याधर्तीवर या भरतीप्रक्रियेत दुरुस्‍ती करण्याची मागणी केली जात आहे. आयोगाच्या परीक्षेसाठी राज्यातील लाखो उमेदवार तयारीला लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर विभाग तथा प्राधिकरणनिहाय निकाल न लावता पूर्वपरीक्षेनंतर राज्यस्तरीय एकच ‘कट ऑफ’ लावावा. राज्यसेवा जाहिरातीप्रमाणे एकच ‘कट ऑफ’ लावून अंतिम निवड यादी बनवताना उमेदवारांनी विकल्पात दिलेल्या विभागांचा तथा प्राधिकरणाचा विचार व्‍हावा. त्यांनी दिलेल्या प्राधान्यानुसार नियुक्त्या द्याव्‍यात, अशी मागणी ऐरणीवर आली आहे.

Mega Bharti News
Nashik News : कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी जनस्थान पुरस्कारांचे वितरण

उमेदवारांच्या मागण्या

- पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी लिपिक-टंकलेखक पदांसाठी राज्यस्तरावर एकच ‘कॉमन कट ऑफ' लावावा

- प्राधिकरणनिहाय ‘कट ऑफ’ची अट रद्द करावी

- सात हजार ३४ पदांसाठी बाराच्‍या गुणोत्तरानुसार ८४ हजार ४०८ उमेदवारांना मुख्य परीक्षेची संधी मिळावी

- रेल्‍वे भरती, स्‍टाफ सिलेक्‍शनची कार्यप्रणाली अवलंबवावी

(गेल्‍या वर्षी रेल्‍वे विभागातील भरतीमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. परंतु उमेदवारांच्‍या आंदोलन, उद्रेकानंतर तांत्रिक दुरुस्‍ती करत भरतीप्रक्रिया राबवली. केंद्रीय स्‍तरावर स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे राबविल्‍या जाणाऱ्या प्रक्रियेचा अभ्यास करत त्‍या धर्तीवर आयोगाने भरतीप्रक्रियेत दुरुस्‍ती करावी, अशी मागणी आहे.)

Mega Bharti News
Baramati News: शिमला नाही ही तर आपली बारामती, गाव हरवलं धुक्यांच्या चादरीमध्ये..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com