Nashik Mahavitaran News : महावितरणने थकवले बचत गटाचे पैसे! महिलांची मुख्यमंत्री, उर्जामंत्र्याकडे दाद

mahavitaran
mahavitaransakal

Nashik Mahavitaran News : महिला बचत गटाकडून महावितरणने कृषीपंपाची थकीत वीजबिल वसुली केली आहे. त्यापोटी रक्कमेवरील कमिशन प्रोत्साहन रक्कम देण्यास महावितरणकडून दिरंगाई होत आहे. यामुळे महिलाना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

हक्काची रक्कम तत्काळ मिळावी अशी मागणी येथील जागृती स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड यांनी केली आहे.

या रकमेबाबत महावितरणची मुख्य कार्यालयास विचारणा केली असता संबंधित फाईल मंत्रालयात प्रलंबित असल्याचे सांगून टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Mahavitaran not paying money of self help group nashik news)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व उर्जा मंत्री देवेद्र फडणवीस, अजित पवार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदींच्या कार्यालयात जाऊन त्यांनी या मागणीचे निवेदन दिले आहे.

१८ डिसेंबर २०२० चा शासन निर्णय व १५ जानेवारी २०२१ चे महावितरणच्या परिपत्रकांन्वये नवीन कृषी पंप वीजजोडणी व कृषी वीज बिल थकबाकीच्या वसुलीचे धोरण ठरविण्यात आलेले आहे. त्यानुसार राज्यभरातील कृषी पंपांच्या थकबाकी वसुलीसाठीचे काम महिला बचत गटांना, ग्रामपंचायतींना व विविध संस्थांना देण्यात आलेले आहे. शासन धोरणानुसार या थकबाकी वसुलीकामी राज्यभरातील विविध महिला बचत गटांनी, संस्थांनी सहभाग नोंदविलेला आहे.

महिलांवर उपासमारीची वेळ

महावितरण कंपनीस महिलांनी मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडील कृषी वीज पंपाची थकबाकी त्यांनी महावितरणला वसूल करून दिलेली आहे.

महावितरणची थकबाकी वसूल करून त्यांनी महावितरणचा तोटा कमी करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे असे असून देखील महावितरणने धोरणात ठरल्याप्रमाणे या महिला बचत गटांची, संस्थांची कमिशन थकबाकी मार्च २०२२ पासून अदा केलेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

mahavitaran
Nashik News : खड्डे चुकविताना नाशिककरांची ‘सर्कस’; वाहनांचेही नुकसान

परिणामी या बचत गटात काम करणाऱ्या गोरगरीब महिलावर मार्च २०२२ पासून नियमानुसार देय कमिशन मोबदला मिळालेला नसल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे.

महिला स्वावलंबी कुटुंब कशा जगवू शकतील याचा विचार करावा, या संस्थांमधील बचत गटांमधील महिला आजही महावितरणला कोट्यावधी रुपयांची थकबाकी वसूल करून देत आहेत, परंतु महावितरणचे अधिकारी या महिलांना थकबाकी अदा करत नसल्यामुळे या महिलांच्या मुलांच्या शिक्षण, औषधोपचार, कुटुंबातील नियमित गरजा भागविणे शक्य होत नाही.

या महिलावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. महावितरणने ज्या महिला बचत गटांमार्फत कोट्यवधी रुपये वसूल करत आहे, त्यांचे कमिशन देय थकबाकी त्यांना तात्काळ अदा केल्यास आपल्या कुटुंबाचा प्रपंच्याचा गाडा हाकणे सुलभ होईल. स्वावलंबी महिलांवर परावलंबी होण्याची वेळ आलेली आहे.त्यामुळे मार्च २०२२ पासूनचे थकित देय लवकरात लवकर कमिशन द्यावे अशी मागणी गायकवाड व महिलांनी निवेदनात केली आहे.

mahavitaran
Nashik News : गर्भवती महिलेवर एकाच वेळी दोन्ही वॉल्व्ह रिप्लेसमेंट अन्‌ प्रसूती; ‘एसएमबीटी’त वाचविला महिलेचा जीव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com