HSC Result : बारावीनंतर ‘सीएस’ होण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

make career as company secretary nashik marathi news

कुठल्‍याही शाखेतून बारावीनंतर तीन स्‍तरांवरील परीक्षांत यश मिळवावे लागते. पहिल्‍या स्‍तरावर सीएस एक्झिक्‍युटिव्‍ह एन्ट्रन्‍स टेस्‍ट (सीएसईईटी) ही पूर्वपरीक्षा कंपनी सेक्रेटरी (सीएस)चे प्रवेशद्वार आहे.

बारावीनंतर ‘सीएस’ होण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी

कंपनीच्‍या कामकाजात संचालक मंडळांच्‍या निर्णयांच्‍या अंमलबजावणीसह प्रशासकीय, व्‍यवस्‍थापकीय निर्णयात सेक्रेटरीची भूमिका महत्त्वाची असते. करिअर म्‍हणून कंपनी सेक्रेटरीपद प्रतिष्ठित असले तरी ध्येयापर्यंत पोचण्यासाठी बारावीनंतर नियमित पदवी घेताना सीएस होण्यासाठी वाटचाल करता येते. 

कुठल्‍याही शाखेतून बारावीनंतर तीन स्‍तरांवरील परीक्षांत यश मिळवावे लागते. पहिल्‍या स्‍तरावर सीएस एक्झिक्‍युटिव्‍ह एन्ट्रन्‍स टेस्‍ट (सीएसईईटी) ही पूर्वपरीक्षा कंपनी सेक्रेटरी (सीएस)चे प्रवेशद्वार आहे. या परीक्षेत बहुपर्यायी वस्‍तुनिष्ठ स्‍वरूपातील प्रत्‍येक पेपरसाठी पन्नास, चार पेपरसाठी दोनशे गुणांची ही परीक्षा असते. वर्षातून मे, जुलै, नोव्‍हेंबर आणि जानेवारी या महिन्यात चार वेळा परीक्षा होते. 

हेही वाचा: वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करताय? मग हे वाचाच

...असा आहे प्रवास

दुसऱ्या टप्प्‍यात एक्झिक्‍युटिव्‍ह प्रोग्राम ही परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. त्यात, मॉड्यूल एक आणि मॉड्यूल दोन अशा दोन्‍ही मॉड्यूलमध्ये चार विषयांची लेखी परीक्षा होते. डिसेंबर आणि जून महिन्‍यात या परीक्षा होतात. तिसरा आणि अत्‍यंत महत्त्वाचा टप्पा प्रोफेशनल प्रोग्राम होय. या टप्प्‍यात तीन मॉड्यूलमध्ये पार पडते. प्रत्‍येक मॉड्यूलमध्ये तीन लेखी पेपर होतात. या परीक्षादेखील डिसेंबर आणि जूनमध्ये होतात. या परीक्षा उत्तीर्ण झालेल्‍या उमेदवारांना अंतिम टप्प्‍यात प्रत्‍यक्ष कामाचा अनुभव घ्यावा लागतो. प्रशिक्षण कार्यक्रम (ट्रेनिंग प्रोग्राम) यशस्विरीत्या पूर्ण केल्‍यानंतर उमेदवार कंपनी सेक्रेटरी म्‍हणवतात. 

हेही वाचा: अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरच्या अमर्याद संधी; जाणून घ्या पर्याय

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ

अभ्यासक्रमात कंपनी कायदा, प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष कर (डायरेक्‍ट ॲन्ड इनडायरेक्‍ट टॅक्‍स), फायनान्‍शियल मॅनेजमेंट, सामान्‍य व वाणिज्‍य क्षेत्राशी निगडित कायदे आदींचा समावेश असतो. कंपनी सेक्रेटरीज होण्यासाठी अर्ज प्रक्रिया व सविस्‍तर माहिती www.icsi.edu या संकेतस्थळावर मिळवता येईल.

Web Title: Make Career Company Secretary Nashik Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top