crime
sakal
नाशिकमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका मुख्याध्यापकाचा मृतदेह ७० फूट खोल विहिरीत आढळून आलाय. मुंबई आग्रा महामार्गावर एका ह़ॉटेलच्या परिसरात त्यांची दुचाकी आढळली होती. त्यानंतर लोकांना संशय आल्यानं पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत शोध घेतला असता हा प्रकार उघड झाला.