esakal | मालेगावात रूग्णसंख्येत कमालीची घट; तरीही स्थिती चिंताजनक
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon

मालेगावात रूग्णसंख्येत कमालीची घट; मात्र स्थिती चिंताजनक

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : शहरात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या (corona infected people) संख्येत कमालीची घट झाली आहे. मात्र, कोरोनामुळे होणारे मृत्यू (corona death) अद्यापही चिंताजनक आहेत. १६ ते २६ मे या दहा दिवसांत मालेगावमध्ये नव्याने २०५ रुग्ण आढळले. मात्र, त्याच वेळी या दहा दिवसांत २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. (patient-numbers decreased in Malegaon situation is worried)

मालेगावची स्थितीही चिंताजनक

दरम्यान, कोरोनाबाधित आढळल्यानंतर घरच्याघरी उपचार, निष्काळजीपणा, त्रास झाल्यानंतर स्थानिक डॉक्टर व प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होणे अशा कारणांमुळे आणि यापूर्वी दाखल असलेले मात्र औषधोपचारास प्रतिसाद न देणाऱ्यांचा मृत्यू यामुळे मृतांची संख्या जास्त दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वेळेत व नियमित उपचारांनी कोरोना बरा होतो, असे सामान्य रुग्णालयाचे डॉ. हितेश महाले, डॉ. संदीप खैरनार यांनी सांगितले. १६ व २२ मेस प्रत्येकी ४० कोरोनाबाधित आढळले होते. याव्यतिरिक्त उर्वरित आठ दिवसांच्या कालावधीत फक्त दोन वेळा २० पेक्षा अधिक रुग्ण मिळून आले. शहरात सध्या फक्त ११ ते २० यादरम्यान नवीन रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे सामान्य रुग्णालय, सहारा व मसगा कोविड सेंटरमध्ये बेड उलपब्ध होत आहेत. खासगी रुग्णालयांतही बेडसाठी फारशी अडचण नाही. ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्‍नही यामुळे मार्गी लागला आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेतच मृत्यूचे प्रमाण कमी होण्याची गरज आहे.

हेही वाचा: जितेंद्र भावे यांचे अर्धनग्न आंदोलन : महापालिका करणार चौकशी

शहरातील दहा दिवसांचे चित्र

तारीख (मे) बाधित मृत्यू

१६ ४० ०१

१७ १३ ०२

१८ ०५ ०२

१९ ०३ ००

२० ०८ ०६

२१ २२ ००

२२ ४० ०१

२३ २६ ०२

२४ ११ ०५

२५ १७ ०३

२६ १६ ००

----------------------------

एकूण २०५ २१

हेही वाचा: गोपानाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेस ६ एप्रिलपर्यंत मान्यता