Nashik News: डासांमुळे मालेगावकर त्रस्त; घाणीचे साम्राज्य, वर्षभरापासून नाही फवारणी

आरोग्य विभागाने शहरात सर्वत्र तत्काळ फवारणी करून डासांचा प्रादुर्भाव कमी करावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
Garbage piled up along the ridge in the collector belt area
Garbage piled up along the ridge in the collector belt areaesakal

सोयगाव : शहर व परिसरातील विविध भागात महापालिकेच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शहरात डास आणि चिलटांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घाण, दुर्गंधी, अस्वच्छता जणू मालेगावच्या पाचवीला पुजली आहे काय? असा प्रश्‍न शहरवासीय उपस्थित करीत आहेत.

डास आणि अस्वच्छतेने मालेगावकर त्रस्त झाले आहेत. (Malegaon suffering due to mosquitoes Empire of dirt no spraying for year Nashik News)

महापालिका प्रशासन नागरिकांकडून सर्व प्रकारचे कर वसूल करते. तुलनेने चांगल्या सुविधा मिळत नाही.

आरोग्य विभागाने शहरात सर्वत्र तत्काळ फवारणी करून डासांचा प्रादुर्भाव कमी करावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ‘स्वच्छ मालेगाव-सुंदर मालेगाव’ ही संकल्पना कागदावर राहिली आहे.

डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सायंकाळी घरामध्ये थांबणे शक्य होत नाही. उद्यान व मैदानांमध्ये थांबता येत नाही. डेंग्यू, मलेरियाचे प्रमाण वाढत आहे. साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली आहे.

या समस्येमुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. औषध फवारणीचे प्रमाण वाढविले पाहिजे, सायंकाळी फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वर्षभरापासून डास व अळीनाशक औषध फवारणी केली जात नाही.

गटारींमध्ये धुरळणी व औषध फवारणी केली जात नाही. वारंवार तक्रारी करून प्रशासन व ठेकेदार त्याकडे लक्ष देत नाहीत. अनेक भागात गटारी व कचऱ्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तसेच घंटागाडी दररोज येत नाही. मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे आहेत. शहरातील प्रत्येक भागात हीच परिस्थिती आहे.

Garbage piled up along the ridge in the collector belt area
Nashik Road Damage: कौळाणे-नांदगाव रस्त्याची 2 वर्षात दुरवस्था; अरुंद मोऱ्या देताहेत अपघाताला निमंत्रण

नागरिक टाकतात कचरा

रस्त्यावरील कचरा ही प्रत्येक शहरातील मोठी समस्या असते. रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे शहर अस्वच्छ दिसते. मालेगाव शहरात कचऱ्याचा प्रश्‍न मोठा आहे. अनेक ठिकाणी मोकळ्या भूखंडावर आणि रस्त्याच्या कडेला नागरिक कचरा टाकतात.

काही जण चालत्या वाहनावरून कचऱ्याची पिशवी रस्त्यालगतच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर भिरकावतात. बेजबाबदारपणे हे दर्शन सुशिक्षित नागरिकांकडून घडत आहे.

"सोयगावसह परिसरात डास, चिलटांमुळे नागरिक त्रासले आहेत. सायंकाळी डास घरात थांबू देत नाहीत. महापालिका प्रशासन झोपले असून गेल्या वर्षभरापासून सोयगावसह परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी झाली नाही. त्यात आता कोरोनाच्या नवीन ‘व्हेरियंट’ने डोके वर काढले आहे. त्याबाबत मालेगाव महानगरपलिकेतर्फे केलेल्या उपाययोजना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न वाऱ्यावर आहे. याबाबत महापालिका आरोग्य प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे."- ॲड. परीक्षित बच्छाव, सोयगाव

Garbage piled up along the ridge in the collector belt area
Nashik: ‘गोदावरी एक्स्प्रेस’ सुरु न झाल्याने प्रवासी संघटनांचा नाराजीचा सूर; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com