Summer : मालेगावचा पारा ४३.२ अंशावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

News about Temperature rise in Nashik city Marathi News

Summer : मालेगावचा पारा ४३.२ अंशावर

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरात ऊन कमी होण्याचे नाव घेत नाही. उन्हाच्या झळांनी मालेगावकर त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी (ता. ६) पारा ४३.२ अंशावर होता.

हेही वाचा: 1922 गावांना पाणीपुरवठा; जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषदेचे नियोजन

शुक्रवारी (ता. ६) बाजाराचा दिवस असल्याने भर उन्हात बाजारपेठांमध्ये गर्दी होती. भाजीपाला खरेदीसाठी नागरिक दुपारी चारनंतर घराबाहेर पडले. गुरुवारी (ता.५) पारा ४३.६ अंशावर होता. तापमान ४४ अंशाखाली आले असले, तरी उन्हाची तीव्रता कायम असून, ग्रामीण भागातील बहुतेक नागरिक अजून शहरात येत नाहीत. शुक्रवारी दिवसभर कडक ऊन (Hot Weather) पडले होते. सायंकाळी पाचनंतर काही प्रमाणात ढगाळ वातावरण (Cloudy Environment) निर्माण झाले होते. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

हेही वाचा: नाशिक : आर्थिक गैरव्यवहाराला राजकीय वळण देण्याचा आटापिटा

Web Title: Malegaon Temperature At 432 Degrees Nashik Summer News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MalegaonNashiksummer
go to top