मालेगाव- लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात वोट जिहाद झाला. ११४ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला. सध्या मालेगाव शहरात अनेक नागरिकांनी विना कागदपत्र व तहसीलदारांचे आदेश नसतानाही जन्मदाखले काढल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर किल्ला पोलिस ठाणे व अपर पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन बोगस आदेशाच्या आधारे महापालिकेतून जन्मदाखले काढलेल्या एक हजार ४४ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.