मांगीतुंगी : भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीवर आज पहिला आंतरराष्ट्रीय दुग्धाभिषेख सोहळा

मांगीतुंगी येथील १०८ फूट उंचीच्या ऋषभ देवाच्या मूर्तीवर आज झालेला पहिला दुग्धाभिषेख
मांगीतुंगी येथील १०८ फूट उंचीच्या ऋषभ देवाच्या मूर्तीवर आज झालेला पहिला दुग्धाभिषेखesakal

सटाणा (नाशिक) : प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी ( ता. बागलान) येथील श्री ऋषभ देवाची १०८ फुटी उंच मूर्तीवर आज पहिला आंतरराष्ट्रीय दुग्धाभिषेख सोहळा आज अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. मांगीतुंगी पर्वतावर २०१६ मध्ये अखंड पाषाणात भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच मूर्ती निर्माण केली होती. आज पहिल्या आंतराष्ट्रीय महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रमुख मुनिजनांच्या उपस्थितीत सकाळी सुरुवात झाली. आजपासून सलग पंधरा दिवस मांगीतुंगी तीर्थक्षेत्रावर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले असून आजच्या कार्यक्रमास देश विदेशातील हजारो जैन बांधवांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती.

कार्यक्रमास पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांना स्वामी रविंद्र किर्ती महाराज यांच्या हस्ते चांदीचे कलश भेट देऊन सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमास पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांना स्वामी रविंद्र किर्ती महाराज यांच्या हस्ते चांदीचे कलश भेट देऊन सन्मानीत करण्यात आले.esakal

या पहिल्या अंतरराष्ट्रीय जैन कुंभ मेळ्याची सुरूवात आज सकाळी गाजीयाबाद येथील जंबुप्रसाद जैन, विद्याप्रसाद, सुरत येथील संजय दिवान, अजय दिवान यांच्या हस्ते सपत्नीक जल, दूध व पंचअमृताने अभिषेक करण्यात आला. यावेळी ऋषभदेवाच्या १०८ फुट उंच असलेल्या मुर्तीवर ड्रोन द्वारे पुष्पवृष्टी करण्यात येत होती. आजच्या कार्यक्रमासाठी विषेश करून उपस्थित असलेल्या मान्यवरांना मांगीतुंगी संस्थानचे पीठाधीश स्वामी रविंद्र किर्ती महाराज यांच्या हस्ते चांदीचे कलश भेट देऊन सन्मानीत करण्यात आले.

हजारो जैन बांधवांची उपस्थिती लक्षवेधी ठरली
हजारो जैन बांधवांची उपस्थिती लक्षवेधी ठरली esakal

अभिषेक सुरू होन्यापूर्वी मुर्ती परीसरात मालेगाव येथील राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळाचे लेझीमपथक व ढोलताशाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारांने मग्न होऊन हजारो जैन बांधव, महिला भगिनींनी ऋषभदेवांच्या जय जय कारावर भावपूर्ण ठेका धरला होता.

मांगीतुंगी येथील १०८ फूट उंचीच्या ऋषभ देवाच्या मूर्तीवर आज झालेला पहिला दुग्धाभिषेख
Ashadhi Wari : रहीमच्या अंगणात रामाचा निवास; धार्मिक सौदार्हाचे प्रतीक

अभिषेक सुरू होन्यापूर्वी मुर्ती परीसरात मालेगाव येथील राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळाचे लेझीमपथक व ढोलताशाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारांने मग्न होऊन हजारो जैन बांधव, महिला भगिनींनी ऋषभदेवांच्या जय जय कारावर भावपूर्ण ठेका धरला होता.

मांगीतुंगी येथे संपन्न होत असलेल्या महामस्तकाभिषेक सोहळ्यास महाराष्ट्रासह देश विदेशातून भक्त गन हजेरी लावणार असल्याने विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी केली आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महामंत्री संजय पापडीवाल (पैठणकर) यांनी केले आहे.

यावेळी चेन्नई येथील कमल डोलीया यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. कार्यक्रमास पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृणष्ण पारधी, कार्याध्यक्ष अनिल जैन, विजयकुमार जैन, डॉ. जीवन जैन, इंजि. सी.आर. पाटील, प्रदीप जैन, भूषण कासलीवाल, चंद्रशेखर कासलीवाल, प्रमोद कासलीवाल, नरेश बंसल, अशोक जोशी ,प्रदीप ठोळे, मनोज ठोळे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मांगीतुंगी येथील १०८ फूट उंचीच्या ऋषभ देवाच्या मूर्तीवर आज झालेला पहिला दुग्धाभिषेख
आषाढी वारी : संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा; पाहा Photos

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com