esakal | धक्कादायक! कारागृहातच आरोपीसोबत घडले भयावह...पोलीसही हादरले
sakal

बोलून बातमी शोधा

jail.jpg

देशभरात अनेक गोल्ड फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांवर दरोडे टाकून सोन्याची लूट करणाऱ्या सुबोध सिंह याच्या टोळीतील होता. सध्या तो हाजीपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. सुबोध सिंह याला बिहार पोलिसांनी 2018 मध्ये अटक केली असून, तो पाटणा मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र, मनीष तेलिया याने कोटाच्या मणिप्पुरम गोल्ड चोरीप्रकरणी टोळीची फसवणूक केल्याने टोळी त्याचा खातमा करण्याच्या प्रयत्नात होती

धक्कादायक! कारागृहातच आरोपीसोबत घडले भयावह...पोलीसही हादरले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : 2018 मध्ये कोटा येथील मणिप्पुरम गोल्ड फायनान्सच्या कार्यालयातून दरोड्यात दरोडेखोरांनी तब्बल 27 किलो सोने पळवून नेले होते. प्रत्यक्ष दरोड्यात तेलियाचा सहभाग नव्हता; परंतु चोरून आणलेले सोने लपविण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. मात्र त्याने त्या सोन्याचा वाटा लूट करणाऱ्यांना न दिल्याने टोळीमध्ये वाद होता. दरम्यान, बिहार पोलिसांनी त्याला अटक केली. कोटा सोने लुटीच्या कटाचा सूत्रधारही सुबोध सिंहच होता. या सुबोधने गेल्या जून 2019 मध्ये नाशिकच्या उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स दरोड्याचा कट रचला होता. 

तरीपण.. कारागृहातच घातल्या गोळ्या 

कोटा (राजस्थान) येथील सोने लूटप्रकरणी अटकेत असलेला सराईत गुन्हेगार मनीष तेलिया याचा शुक्रवारी (ता. 3) दुपारी हाजीपूर (बिहार) मध्यवर्ती कारागृहात गोळ्या घालून खून करण्यात आला. गेल्या वर्षी नाशिकच्या उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स दरोड्याच्या प्रकरणात तेलियाचा सहभाग असल्याचे नाशिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आले होते. त्याचा ताबा घेण्यासाठी नाशिक पोलिसांचा पाठपुरावा सुरू होता. 

नाशिक गुन्हे शाखेने मागितला होता ताबा

नाशिक शहर गुन्हे शाखेने या प्रकरणी मोक्कान्वये गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत पाच जणांना अटकही केली आहे. तपासामध्ये मनीष तेलिया याचाही सहभाग निश्‍चित झाला होता. त्याचा ताबा घेण्यासाठी नाशिक गुन्हे शाखेने हाजीपूर कारागृहाकडे पाठपुरावाही सुरू होता. मात्र, ताबा घेण्यापूर्वीच त्याचा कारागृहात खून झाल्याने नाशिक पोलिसांच्या तपासालाही धक्का बसला आहे. 
 
मनीषवर दुसऱ्यांदा गोळीबार 
मनीष तेलिया देशभरात अनेक गोल्ड फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांवर दरोडे टाकून सोन्याची लूट करणाऱ्या सुबोध सिंह याच्या टोळीतील होता. सध्या तो हाजीपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. सुबोध सिंह याला बिहार पोलिसांनी 2018 मध्ये अटक केली असून, तो पाटणा मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र, मनीष तेलिया याने कोटाच्या मणिप्पुरम गोल्ड चोरीप्रकरणी टोळीची फसवणूक केल्याने टोळी त्याचा खातमा करण्याच्या प्रयत्नात होती. मे 2019 मध्येही मनीष तेलिया याच्यावर न्यायालयाच्या आवारात गोळीबार झाला होता. त्यात तो थोडक्‍यात बचावला. मात्र, गेल्या शुक्रवारी (ता. 3) हाजीपूर कारागृहात दुपारी अडीचच्या सुमारास दोघा संशयितांनी गोळ्या घालून मनीषचा खून केला. या घटनेने बिहार पोलिस हादरले आहेत. 
 

हेही वाचा > दहा वर्षाच्या मुलांचा धक्कादायक प्रकार...पोलिसांसह पालकही चक्रावले..​

प्रत्यक्ष दरोड्यात तेलियाचा सहभाग नव्हता..

मुथूट फायनान्स दरोड्याच्या कटामध्ये मनीष तेलिया याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याची हाजीपूर कारागृहात चौकशीही केली होती. त्यानुसार त्याचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. - समीर शेख, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक 

हेही वाचा > भयावह! बाईकवरून सुसाट जाताना..अचानक बाजूच्या धावत्या कारचा दरवाजा उघडला...

loading image