MSRTC Strike | मनमाड आगाराला प्रतीक्षा कामगारांची

Manmad ST Depot waiting for Workers
Manmad ST Depot waiting for Workersesakal

मनमाड (जि. नाशिक) : एसटी संपकऱ्यांना न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याबाबत कळवले आहे. त्यामुळे संपातील (ST Strike) कर्मचारी आता कामावर येणार का आणि एसटी (ST) पुन्हा सुरळीत होणार का, याची प्रतीक्षा प्रवाशांसह सर्वांनाच लागली आहे.

संपूर्ण एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या १५३ दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. याबाबत न्यायालयाने सर्व कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हावे. महामंडळाने कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई मागे घ्यावी, असे आदेश दिले. परिवहन मंत्र्यांनीही (Minister of Transport) याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता कर्मचारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोर्टाने कर्मचाऱ्यांना रुजू होण्याबाबत आदेश दिला असला तरी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे की नाही, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यासंदर्भात आता काय भूमिका घेतात, राज्य सरकार आणि त्यांच्यात नेमकी काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manmad ST Depot waiting for Workers
गुजरातमध्ये कंपनीत स्फोट; ६ कामगारांचा मृत्यू

संपकाळात मनमाड आगारातील २३६ कर्मचाऱ्यांपैकी ६४ कर्मचारी कामावर हजर आहे. ५४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर सध्या कंत्राटी ९ चालक कामगार हजर आहेत.

Manmad ST Depot waiting for Workers
यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याने वाद; ट्विट करीत म्हणाल्या...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com