Nashik Marathi School : शाळेची पटसंख्या टिकविताना दमछाक; विद्यार्थी शोधण्यात शिक्षक गर्क

Marathi medium school teacher are finding students to enroll in school nashik news
Marathi medium school teacher are finding students to enroll in school nashik newsesakal
Updated on

Nashik Marathi School : शाळेची पटसंख्या टिकावी किमान ३५ विद्यार्थ्यामागे एक तुकडी भरत असते. त्यावर शिक्षकांची नोकरी व अनुदान अवलंबून असते. यामुळे सध्या नाशिक शहरातील शिक्षक झोपडपट्ट्यांमध्ये मुले शोधण्यासाठी गर्क आहेत.

गेल्या महिनाभरापासून शिक्षक आपल्या शाळेसाठी मुले शोधत असून शाळेची पटसंख्या टिकण्याबरोबरच तुकडी टिकवण्यासाठी शिक्षकांची धावाधाव सुरू आहे. (Marathi medium school teacher are finding students to enroll in school nashik news)

नाशिक शहरात सध्या इंग्रजी शाळांचे पीक मोठ्या प्रमाणावर आले आहे. अशातच मराठी माध्यमांच्या शाळा पटसंख्याअभावी मागे राहत आहे. शाळेत मुले न आल्यामुळे अनेक तुकड्या बंद पडत आहे. पर्यायाने शिक्षक अतिरिक्त ठरत आहे.

१५ जूनला शाळा उघडणार आहे. अशामध्येच एक तुकडीचा कोटा पूर्ण व्हावा यासाठी शिक्षक मुले शोधत आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्यामुळे भविष्यात शाळेची अवस्था बिकट होत जाणार आहे.

म्हणून सध्या संस्थाचालकांच्या आदेशानुसार आणि शिक्षकांची नोकरी टिकावी, शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरवू नये यासाठी सध्या शिक्षक बांधव नाशिक शहरातील वस्त्यांमध्ये मुले शोधण्यासाठी जात आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Marathi medium school teacher are finding students to enroll in school nashik news
Zp School Student : अकोला जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी लघुचित्रपटातून झळकणार अमेरिकेत

नाशिक शहरातील सातपूर, सिडको, अंबड, नाशिक रोड या भागांमध्ये खासगी शाळेतील शिक्षक सध्या फिरताना दिसत आहे. मुलांना शाळेत जायला वाहन नसल्यास वाहनाची व्यवस्था करून दिली जात असून, शैक्षणिक साहित्य, गणवेशाचे आमिष दाखवले जात आहे. सकारात्मक दृष्टीने शाळेसाठी मुलांची एका अर्थाने पळवापळवी सुरू असल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये होत आहे.

"सध्या पटसंख्या टिकवणे हे शिक्षकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आम्ही पदरमोड करून गरीब मुलांची फी भरतो. शिवाय त्यांना सामाजिक योगदानातून शैक्षणिक साहित्य व इतर मदत करीत असतो.

स्पर्धेच्या युगात शिक्षण संस्था शाळेतील मुलांसाठी असणाऱ्या सुविधा पालकांना सांगत आहे. यासाठी डिजिटल जाहिराती बरोबरच शिक्षक वाड्यावर वस्त्यांमध्ये जाऊन विद्यार्थी पालकांचे प्रबोधन करतात." - प्रवीण जोशी, साने गुरुजी शिक्षण संस्था

Marathi medium school teacher are finding students to enroll in school nashik news
Nashik Revenue Office : महसूल कार्यालयात खासगी वाहनांना प्रवेश बंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Teacher Award 2026 Sandeep Shinde Receives Pune District Honour After Transforming School And Guiding Students To Success
Chandwad Teacher Vacancies
800 Teacher Posts Approved for Urdu Medium Schools
Maharashtra Teacher Recruitment 2026
Marathi News Esakal
www.esakal.com