नाशिक : उन्हाळ कांद्याचे बाजारभाव हजारापर्यत

summer onion
summer onionesakal

येवला (जि. नाशिक) : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उन्हाळ कांदा आवकेस सुरुवात झाली असून बाजारभावाने हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, केरळ आदी राज्यात व परदेशात मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात कांदा आवक ७१ हजार ३७४ क्विटल झाली. लालकांद्याचे बाजारभाव १५० ते ८२९ तर सरासरी ६०० रुपये प्रति क्विटलपर्यंत होते. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव ३०० ते ११०० तर सरासरी ८५० रुपये प्रति क्विटलपर्यंत होते.

उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची आवक ४० हजार ८८ क्विटल झाली असून लालकांद्याचे बाजारभाव १५० ते ७८३ तर सरासरी ६०० रुपये प्रतिक्विटल पर्यंत होते. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव ३०० ते १०७५ तर सरासरी ८५० रुपये प्रतिक्विटल पर्यंत होते.

गव्हाच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाली. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. गव्हाची आवक २८६ क्विंटल झाली असून बाजारभाव १८९९ ते २५७५ तर सरासरी २१२५ रुपयापर्यंत होते. बाजरीची आवक टिकून होती तर बाजारभावात वाढ झाली. बाजरीस स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिली. आवक १०३ क्विटल झाली, बाजारभाव १८५० ते २५०० तर सरासरी १९७५ रुपयांपर्यंत होते. हरभ-याच्या आवकेत वाढ झाली तर व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. आवक १८२ क्विंटल झाली, बाजारभाव ४००० ते ५३९९ तर सरासरी ४८०० रुपयांपर्यंत होते. तुरीच्या आवकेत वाढ झाली तर व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिली. तुरीची आवक ३०३ क्विंटल झाली असून बाजारभाव ४००० ते ६१०० तर सरासरी ५८०० रुपयांपर्यंत होते.

summer onion
कांद्याच्या घसरत्या दरामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी | Nashik

नाशिक : कांदाचाळ दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु

सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली तर सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. आवक ३०९ क्विटल झाली, बाजारभाव ५००० ते ७५०१ तर सरासरी ७४०० रुपयापर्यंत होते. मक्याच्या आवकेत घट झाली तर मकास व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. मक्याची आवक ३ हजार ८४२ क्विंटल झाली असून बाजारभाव १९०० ते २२९० तर सरासरी २२४० रुपये प्रति क्विटलपर्यंत होते अशी माहिती बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com