शुभमंगल सावधानचा गुंजणार सूर! तुलसी विवाहानंतर धूमधडाका; वरवधू पित्यांची धावपळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marriage ceremony

शुभमंगल सावधानचा गुंजणार सूर! वरवधू पित्यांची धावपळ

sakal_logo
By
सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : कोरोनामुळे (Corona) गेली दोन वर्षे सर्वच सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांवर बंधने होती. विवाह समारंभही बंधनाच्या फेऱ्यात अडकले होते. जास्तीत जास्त ५० लोकांमध्ये विवाह होत होते. आता कोरोनाचे संकट दूर होऊ लागल्याने विवाह सोहळ्यांचीही धामधूम पाहायला मिळणार आहे. उद्या (ता.१५) तुळशी विवाहासोबतच विवाहाचा बारही उडणार आहे.सर्वत्र शुभमंगल सावधानचे सूर गुंजणार आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान विवाहासाठी मुहूर्त असून, यंदा काही जास्तीचे मुहूर्त आल्याने वरवधू पित्यांची सोय झाली आहे.

विवाह समारंभातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यात मंडप, बँड, कॅटरिंग, फर्निचर, फोटोग्राफी सारख्या व्यवसायात गुंतलेल्यांचा समावेश आहे. कोरोनाचे संकट आता दूर होऊ लागल्याने सर्वच व्यवहारांची गाडी पुन्हा गाडी रुळावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेले दोन अडीच वर्षे रखडलेल्या विवाहांचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनाच्या संकटातही काही तरुण-तरुणींचे विवाह सोहळे मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत घरच्याघरी पार पडले. या काळात मंगल कार्यालयांना कुलुपच होते. त्यामुळे व्यवसायाशी निगडित सर्वांचेच नुकसान झाले. आता पुन्हा या व्यवसायाला उभारी येण्याची आशा निर्माण झाली आहे.

हेही वाचा: बघा अक्षय कुमार काय म्हणतोय...'मी धर्मासाठी जगलोय अन्'...

तुळसी विवाहासोबतच विवाह समारंभाचा प्रारंभ

दिवाळीनंतर कार्तिक महिन्यात तुळसीविवाहनंतर लग्नाची धामधूम सुरू होते. यंदा १५ नोव्हेंबरपासून ही धामधमू बघावयास मिळणार आहे. विवाहासाठी जुलै २०२२ पर्यंत अनेक मुहूर्त आहेत. त्यामुळे विवाहेच्छूक वधू-वर कुटुंबीयांकडून लग्नासाठी लगबग सुरू आहे. मंगल कार्यालयांमध्ये बुकिंगसाठीही धावपळ सुरू आहे. यंदा जास्तीच्या मुहुर्ताचीही भर पडल्याने विवाह समारंभ आयोजित करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

''विवाह समारंभांमुळे केटरिंगसह मंडप व्यवसायातील मरगळ दूर होऊन अनेकांना रोजगार मिळू शकेल. आमचेही झालेले नुकसान भरून निघेल अशा आशा आहे.'' - कल्पेश गायखे, राहुल सावंत, संघर्ष इव्हेंट मॅनेजमेंट, चांदोरी

''महागड्या किमतीचे कॅमेरे खरेदी करूनही कोरोनामुळे व्यवसाय बंद होता. या लग्नसराईत साहजिकच फोटोग्राफी व्यवसाय सुरळीत होऊन आर्थिक प्रश्न मिटण्यास मदत होईल.'' - दीपक बिडकर, सर्वज्ञ फोटो, पिंपळस रामाचे.

''गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या निर्बंधांमुळे फर्निचर व्यवसाय काहीसा थंडावला होता. निर्बंध शिथिल झाल्याने फर्निचरला ही मागणी वाढली असून अनेकांना रोजगार निर्माण झाला आहे.'' - रोशन टर्ले, ओम साई फर्निचर, चांदोरी.

हेही वाचा: मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही? शरद पवारांनी दिलं उत्तर

loading image
go to top