esakal | विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

married woman 123.jpg

सासरच्या मंडळींनी चारित्र्यावर संशय घेऊन तिला उपाशीपोटी ठेवून वेळोवेळी छळ केला. एका मॅटर्निटी होममध्ये नेऊन बळजबरीने गर्भपातही केला

विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : विवाहितेचा छळ करून तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेत त्याचा अपहार केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की.. 

मॅटर्निटी होममध्ये नेऊन बळजबरीने गर्भपात

सासरच्या मंडळींनी चारित्र्यावर संशय घेऊन तिला उपाशीपोटी ठेवून वेळोवेळी छळ केला. एका मॅटर्निटी होममध्ये नेऊन बळजबरीने गर्भपात केला. तसेच तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेऊन त्याचा अपहार केला. त्यानुसार सिद्धांत शिंदे (वय ३०), शीतल सुखलाल नरवाडे (३५), सुखलाल नरवाडे (४२, रा. भक्ती रो- हाउस, स्वामी विवेकानंद क्लाससमोर, दौलतनगर, सिडको), मनोज रमेश मराठे (३६, रा. नागनाथ रो- हाउस, दुसरा मजला, जी. डी. सावंत कॉलेजजवळ, गजानननगर, पाथर्डी फाटा) यांनी संगनमताने विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक गवांदे तपास करीत आहेत.  

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

loading image
go to top