
नाशिक : असंख्य अडचणी...चिमुकलीचा सांभाळ करतानाच वीरपत्नी यशोदा गोसावी यांनी बरावीत उत्तम यश मिळविले आहे. पती हुतात्मा झाल्यानंतर सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याच्या धडपडीतून त्या पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात दाखल झाल्या. कला शाखेतून ७५ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाल्या असून, आता लष्करभरतीची तयारी करत आहेत.
पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात पती शहीद...
नोव्हेंबर २०१८ मध्ये नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात केशव गोसावी शहीद झाले. त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या आठ दिवसांतच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. पतीच्या निधनाने खचून न जाता यशोदा यांनी बाळाचा सांभाळ करतानाच, शिक्षणही सुरू केले. लग्नापूर्वी त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)मध्ये प्रशिक्षण घेतलेले होते; परंतु पती शहीद झाल्यानंतर त्यांनीही सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. पात्रतेसाठी आवश्यक असल्याने, त्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांनी कला शाखेतून ७५ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
आता लष्करभरतीची तयारी...
औरंगाबाद जिल्ह्यातील पाथरे येथील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. त्यांची मुलगीही आता दीड वर्षाची असून, तिला आई-वडिलांकडे सोडून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. सैन्यात भरती होण्याच्या आपल्या ध्येयाच्या दिशेने त्या वाटचाल करीत आहेत.
पतीच्या निधनानंतर मी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता; परंतु त्यासाठी माझे शिक्षण कमी असल्याने बारावीला प्रवेश घेतला. बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. आता ध्येयाकडे वाटचाल करत राहणार आहे. - यशोदा गोसावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.