Mathadi Workers Strike : नाशिक बाजार समितीत कोटीची उलाढाल ठप्प!

Due to the strike of Mathadi workers, the chaos spread in the market committee.
Due to the strike of Mathadi workers, the chaos spread in the market committee. esakal

पंचवटी (जि. नाशिक) : माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनने पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक बंदमध्ये पंचवटीतील शरदचंद्रजी पवार मार्केटमधील हमाल, मापारी सहभागी झाले.

पूर्ण करा पूर्ण करा हमाल माथाडी कामगारांच्या मागण्या पूर्ण करा, अशी घोषणाबाजी करण्यात आली.मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा देखील देण्यात आला आहे. बाजार समितीत नाशिक, दिंडोरी, सिन्नर, निफाड तालुक्यातील तसेच म्हसरूळ, आडगाव, मखमलाबाद, नांदूर - मानूर दसक - पचक आदी भागांतून कांद्याची आवक होत असते.

सर्व साधारणपणे ऐंशी ते एक कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे सचिव अरुण काळे सचिव यांनी सांगितले. (Mathadi Workers Strike Crore turnover stopped in Nashik Bazaar Committee nashik news)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Due to the strike of Mathadi workers, the chaos spread in the market committee.
Nashik News : इंदिरानगरच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंग रोडचा प्रस्ताव

राज्य शासनाच्या विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची माहिती यादीच या वेळी वाचून दाखविण्यात आली. माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडे प्रलंबित आहेत.

बाजार समितीमध्ये राजीनामा दिलेल्या माथाडी व मापारी कामगारांच्या जागी नवीन कामगारास बाजार समितीचा परवाना घेणेबाबत येणाऱ्या अडचणींची सोडवणूक व्हावी, या स्वरूपाच्या मागण्या आहेत.

या संपात प्रकाश जगदाळे,रामचंद्र लाडे, संदीप लोखंडे, सुभाष इंगळे, सलीम शेख, राजू चोथे, शंकर कनकुसे ,संजय जाधव, दत्ता आघाव, रवींद्र सोनवणे, सुनील थोरे आदी हमाल मापारी सहभागी झाले होते.

Due to the strike of Mathadi workers, the chaos spread in the market committee.
Manas Pagar : सत्यजित तांबेंच्या विजयापेक्षा सुधीर तांबेंना मानसचा अंत्यविधी महत्वाचा

"शासन निर्मित महामंडळ कर्मचारी नाहीत. आमचे पगार पाच तारखेऐवजी उशिरा होतात. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मोर्चे काढू. हा एक दिवसीय लाक्षणिक संप होता, यापुढे बेमुदत संपावर जाऊ. तरीदेखील शासनाने मागण्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या."

- सुनील यादव , जनरल सेक्रेटरी, राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियन

"राज्य सरकारने सकारात्मक विचार करीत विविध माथाडी मंडळांच्या पुनर्रचना करून या पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सदस्यांच्या नेमणुका करणे गरजेचे आहे. विविध माथाडी मंडळांच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुला- मुलींना काम करण्याची संधी देण्यासंदर्भात ही मागणी बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे."

- चंद्रकांत निकम, माजी हमाल मापारी प्रतिनिधी, नाशिक बाजार समिती

Due to the strike of Mathadi workers, the chaos spread in the market committee.
Education Sector on Budget 2023 : शिक्षण क्षेत्रात कही खुशी, कही गम’; मान्यवरांच्या प्रतिक्रिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com