Nashik News : इंदिरानगरच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंग रोडचा प्रस्ताव

Officers and representatives present for the meeting with Police Officer Sitaram Gaikwad.
Officers and representatives present for the meeting with Police Officer Sitaram Gaikwad.esakal

इंदिरानगर (जि. नाशिक) : इंदिरानगर भागातील अवजड वाहतूक टाळण्यासाठी या परिसरासाठी रिंग रोडचा प्रस्ताव प्रशासनास सादर करण्यात येणार असल्याचा निर्णय मंगळवारी (ता. ३१) वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सीताराम गायकवाड यांनी आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला. (Ring road proposed to solve traffic problems of Indiranagar Nashik News)

बैठकीत पर्यायी मार्ग व पार्किंग सुविधा उपलब्ध होईपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक इंदिरानगर व तपोवन मार्गे बंद करण्यास सर्व प्रतिनिधींनी तीव्र विरोध केला. तसेच मालवाहू वाहनांना इंदिरानगर भागातून प्रवेश बंद केल्यास औद्योगिक वसाहतीस कच्चा माल मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे त्याचे दूरगामी दुष्परिणाम होतील.

मालवाहू वाहनांना प्रथम योग्य मार्ग (रिंगरोड) व थांब्यासाठी ट्रक टर्मिनल सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे व त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा चालू असल्याबाबत आयमा, निमा व ट्रक संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले. याबाबत सर्व संबंधित विभागाची लवकरच बैठक घेणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Officers and representatives present for the meeting with Police Officer Sitaram Gaikwad.
Graduate Election Result : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; उमेदवारांची उत्सुकता शिगेला

या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष पवार, सुधीर डोंबरे, पराग जाधव, दिनकर कदम, राकेश हांडे, छाया देवरे, राजेंद्र वाघ, आयमा, निमा व ट्रक संघटनेचे प्रतिनिधी राजेंद्र फड, मनीष रावल, किशोर इंगळे, रवींद्र झोपे, संजय सोनवणे, सुदर्शन डोंगरे, योगिता आहेर, सुलेमान सय्यद, श्रीधर वाघमारे, सदाशिव पवार, महेश ज्ञाने, गणेश नागरे, अमोल शेळके, विशाल पाठक आदींसह औद्योगिक वसाहत संघटना तसेच अखिल भारतीय ट्रक मालक-चालक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

बैठकीबाबत आश्‍चर्य

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या प्रश्नावर झालेल्या उपोषणादरम्यान यासाठी प्रयत्नशील असणारे स्थानिक नगरसेवकदेखील सहभागी झाले होते. वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांनी पोलिस आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. मध्येच वाहतूक शाखेने ही बैठक घेतल्याने याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Officers and representatives present for the meeting with Police Officer Sitaram Gaikwad.
Nashik Graduate Election Result : नाशिक पदवीधर निवडणूकीची मतमोजणी सुरू; पाहा Photos

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com