esakal | ही स्टंटबाजी करण्याची वेळ नाही! महापौरांचा शिवसेनेला सल्ला

बोलून बातमी शोधा

shivsena
ही स्टंटबाजी करण्याची वेळ नाही! महापौरांचा शिवसेनेला सल्ला
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सात सदस्यांची समिती गठित केली आहे. पंधरा दिवसात समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई होईलच, मात्र आपत्तीजनक परिस्थितीमध्ये महापालिकेतील विरोधी पक्ष शिवसेनेने कुठल्याही प्रकारची स्टंटबाजी न करू नये, असा सल्ला महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिला.

स्टंटबाजी करण्याची वेळ नाही

महापौर कुलकर्णी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरु असून राज्यात अनेक ठिकाणी दुर्घटना घडून त्यात अनेकांचे प्राण गेले आहे. या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांकडे राज्यातील विरोधी पक्षाने राजीनाम्याची मागणी केलेली नाही. हे भाजपच्या परिपक्वतेचे लक्षण आहे. कोरोनाच्या वैश्विक महामारीचा सामना करण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रित संकटाचा सामना करण्याची वेळ आहे.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : उच्चस्तरीय चौकशी समितीत कोण कोण असणार?

जिल्हा प्रशासनाची जबाबदारी

वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिका व खासगी रुग्णालयात बेड उपलब्धतेची परिस्थिती गंभीर होत आहे. वाढत्या रुगण्संख्येमूळे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाही. या परिस्थितीत महापालिकेचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. सध्या दररोज ५०० रुग्णांना आवश्यक असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती असली तरी सदरची बाब महापालिकेच्या अखत्यारीत नसून राज्य शासन व जिल्हा प्रशासनाची आहे.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

पायाभूत सुविधा भक्कम

बिटको, डॉ. झाकिर हुसेन या दोन मोठ्या रुग्णालयांमध्ये ३७ व्हेंटिलेटर बेड, ५५० ऑक्सिजन बेड आहे. महापालिकेच्या समाजकल्याण, मेरी हॉस्टेल, ठक्कर डोम, क्रॉम्प्टन हॉल, संभाजी स्टेडिअम, मीनाताई ठाकरे स्टेडिअम, नाशिक रोड येथील फायर क्वार्टर येथे प्राथमिक उपचाराची सोय असून, एकूण २२४९ सर्वसाधारण बेड असल्याची माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली.