esakal | आदिमाया सप्तशृंगगडावरील औषधी वनस्पतींचा ठेवा ठरला वरदान! व्यावसायिकांच्या आशा पल्लवित 
sakal

बोलून बातमी शोधा

vani gad 3.jpg

देवाची दारे उघडण्याचे संकेत मिळत असल्याने मंदिर व पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या विविध घटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आदिमाया सप्तशृंगगडावर असलेला औषधी वनस्पतींचा ठेवा या भागाला वरदान ठरला आहे. लॉकडाउनमुळे वनस्पती विक्री करणारे शेकडो किरकोळ व्यावसायिक बेरोजगार झाले.

आदिमाया सप्तशृंगगडावरील औषधी वनस्पतींचा ठेवा ठरला वरदान! व्यावसायिकांच्या आशा पल्लवित 

sakal_logo
By
गोकुळ खैरनार

मालेगाव (जि.नाशिक) : देवाची दारे उघडण्याचे संकेत मिळत असल्याने मंदिर व पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या विविध घटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आदिमाया सप्तशृंगगडावर असलेला औषधी वनस्पतींचा ठेवा या भागाला वरदान ठरला आहे. लॉकडाउनमुळे वनस्पती विक्री करणारे शेकडो किरकोळ व्यावसायिक बेरोजगार झाले.

औषधी वनस्पतींची शोधाशोध सुरू 

सहा महिन्यांत ग्राहकच नसल्याने वनस्पतीची शोधाशोध झाली नाही. हिरवळीने नटलेल्या गडाच्या दऱ्याखोऱ्यातून तसेच कपारीतून औषधी वनस्पती शोधण्यात आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे. यामुळे मंदिर उघडल्यावर भाविक व पर्यटकांना या गुणकारी औषधी वनस्पती सहज उपलब्ध होऊ शकतील. 

 मंदिर उघडण्याच्या संकेताने व्यावसायिकांच्या आशा पल्लवित
पूर्वी पुरेशा वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक विविध आजारांवर औषधोपचारासाठी या वनस्पतींचाच वापर करत. आजही अनेक श्रद्धाळूंसह आदिवासी बांधव पारंपरिक औषधी वनस्पती विविध आजारांसाठी वापरतात. त्यामुळे त्यांचे महत्त्व टिकून आहे. सप्तशृंगगडावर पावसाळा, हिवाळा व उन्हाळा अशा तिन्ही ऋतूंत वेगवेगळ्या वनस्पती मिळतात. अतिशय कठीण दऱ्याखोऱ्यात, कपारीत व घनदाट जंगलातून वनस्पती शोधून आणणे आव्हानात्मक काम असते. या भागातील आदिवासी बांधव वनस्पती शोधून त्यांची विक्री करतात. सप्तशृंगगड पुन्हा ‘जय अंबे’च्या जयघोषाने गजबजेल, या आशेने आदिवासी बांधव नव्या जोमाने औषधी वनस्पतींची शोधाशोध करीत आहेत. 

या ठिकाणी आहे गुणकारी वनस्पती 
* प्रदक्षिणा मार्गाच्या घनदाट जंगलात * वन विभागाच्या जंगलात * भवानी तलावानजीक असलेल्या रतनगडच्या कपारींमध्ये 
* धोंड्याकोंड्या विहिरीच्या पूर्वेला डोंगर उतारावर * डोंगरपायथ्याच्या चारही बाजूंच्या घनदाट जंगलात. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

सप्तशृंगगडावर आहेत या वनस्पती : 
मुरुडशेंग, बाव्याची शेंग, गौळणफळ, राजहंस, रानकांदा, आडकांदी, जंगलीमका, काळापाड, हातजोडी, पायजोडी, कवडीची माळ, गाळ वनस्पती, नागकाडी, रडकावेल, बेहडा, जंगली केळी, कळलावी, पिवळी हळद, जांभळी हळद, तपकिरी हळद, सफेद हळद, टोकरी हळद, येडावेल, कचोरापाला, सुपली, हाडसांधी, हाडसांधा, मनचंदी आदी. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

लॉकडाउनमुळे मंदिर बंद असल्याने भाविकांचे येणे बंद झाले. त्यामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला. औषधी वनस्पतींना चांगली मागणी असते. दऱ्याखोऱ्या, कपारी व जंगलातून वनस्पती शोधण्याचे काम पंधरा दिवसांपासून सुरू केले आहे. ताजी व टवटवीत वनस्पती गडावर आहे. मंदिर सुरू झाल्यास आमच्या रोजीरोटीबरोबरच रुग्णांना औषधी वनस्पती मिळणे सोपे होईल. - युवराज ठाकरे, वनस्पती विक्रेते डोंगरी जयदर, ता. कळवण 

औषधी वनस्पती हा सप्तशृंगगडाचा अमूल्य ठेवा आहे. वन विभागासह गडावरील विविध घटकांनी हा ठेवा जपला आहे. मंदिर बंद असल्याने वनस्पती विक्रेत्यांसह गडावरील शेकडो लहान व्यावसायिक संकटात आहेत. शासनाने या घटकांचा विचार करून तातडीने धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुले करावे. - संदीप बेनके सामाजिक कार्यकर्ते, सप्तशृंगगड  

loading image
go to top